आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Firing On Indian Side, Defence Minister Jaitley Warned Pakistan

पाकला कुरापत महागात पडेल, संरक्षणमंत्री जेटलींनी ठणकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारताने गुरुवारी खडे बोल सुनावले. पाकिस्तानने भ्याड हल्ले थांबवावे, अन्यथा त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला.

दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी रात्री जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यांत ६० चौक्या आणि १३० गावांवर गोळीबार केला. त्यात बीएसएफच्या ३ जवानांसह १२ जण जखमी झाले. भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या सियालकोटमधील चारवाह भागात २ जण ठार झाले. बीएसएफने जम्मू, कठुआ आणि सांबा या भागातील ३० हजारांवर लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले.

शरीफ यांनी बोलावली एनएससीची बैठक : भारताने कडक प्रत्युत्तर दिल्याने पाकची घाबरगुंडी उडाली आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी)बैठक बोलावली आहे. दरम्यान, जेटली यांना प्रत्युतर देताना पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम म्हणाल्या की, आम्हीही उत्तर देण्यास सक्षम आहोत.