आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदाच्या नावाखाली केले जाणारे अॅलोपॅथीचे उपचार थांबवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या अायुर्वेद दिनानिमित्त देशातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (एआयआयए)चे मंगळवारी उद््घाटन केले. हे संस्थान एम्सच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. आयुर्वेद शिकणाऱ्या किती विद्यार्थ्यांची आयुर्वेदावर १००% श्रद्धा आहे, असा प्रश्न करून मोदी म्हणाले, आयुर्वेदावर १००% विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. लाेक आयुर्वेदाचा बोर्ड लावून रुग्णालय सुरू करतात आणि अॅलोपॅथीचे उपचार करतात, असे वास्तवही मोदींनी सांगितले. त्वरित परिणाम देणारे औषध तयार करण्यासाठी देशपातळीवर संशोधन गरजेचे आहे, असेही मोदी म्हणाले.

पहिल्या अ. भा. आयुर्वेद संस्थानचे उद््घाटन
- एआयआयए १० एकर परिसरात वसले आहे. या संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी २०० कोटी रुपये मंजूर आहेत.
- पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजीचीही सुविधा. संशोधनासाठी २०० बेडचे रेफरल रुग्णालय.
- आेपीडीमध्ये रोज सरासरी १ हजार रुग्ण येतात. ३५ फॅकल्टी असून पदव्युत्तरच्या ५६ जागा आहेत.
बातम्या आणखी आहेत...