आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या अंदाजाने उत्तराखंडमधील परिस्थिती चिघळण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : गेल्या पंधरवाड्यातील पावसाच्या आणि पाठोपाठ महाभयंकर पुराच्या थैमानातून सावरणार्‍या उत्तराखंडला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत उत्तरकाशी, रूद्रप्रयाग आणि चमोलीसह गढवाल प्रदेशात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या भागांत १० ते ३० मिलिमीटर तसेच पर्वतीय क्षेत्रात ३० ते ५० मिलिमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे.