आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुली, मुलगा-सून, भावाच्या हत्येनंतर वृद्धेची करुण कहाणी, ७ मुलांची जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
रायपूर - रविशंकर विद्यापीठामागील कुकरबेडा वस्ती. पॉश भागातील तट्ट्यांच्या वस्तीत बहुतांश देवार कुटुंबीय राहतात. या वस्तीतील ७० वर्षीय वृद्धा अनसूया. मळक्या साडीतील अनुसूया थकल्या पावलांनी घराकडे निघाली आहे. तिला थांबवून अरुण चंद्राकरचा पत्ता विचारला, तिने वळून पाहिले, चेहऱ्यावर संतप्त भाव होते. अडखळत म्हणाली, हो... ज्याने माझ्या दोन मुलींनंतर माझा मुलगा-सून आणि भावाला ठार केले त्या अरुण चंद्राकरची मी सासू आहे. पाप केल्याने तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे, पण मी... मी तर रोज मरत आहे. जळतण विकून त्या सर्वांच्या सात मुलांच्या पोटात काही पडते. तरीही सर्व जण मला सिरियल किलरची सासू का म्हणतात?
एवढे बोलल्यानंतर तिचे डोळे भरून आले. कापऱ्या आवाजात म्हणाली.. बाबू, त्याने सर्वांना ठार मारले. कोणालाही सोडले नाही. आता स्वत: तुरुंगात आहे आणि माझ्यावर सात मुलांची जबाबदारी सोडली आहे.आता थकलेले शरीरही साथ देत नाही. जळतण विकून मुलांचे पोट भरू शकते. ज्या दिवशी बाहेर जाऊ शकत नाही त्या दिवशी नातवंडांना उपाशी राहावे लागते. काय करू, कुठे जाऊ,कोणाला मदत मागू काहीच समजत नाही. असे म्हणून त्या रडू लागल्या. नंतर सावरत म्हणाल्या,विष घेऊन मरून जावे, असे वाटते, पण पाच मुलींची काळजी वाटते. मी गेल्यावर त्यांचे काय होईल? अनुसूया मुलांचे कसेबसे पालनपोषण करत आहे, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेत आहे. मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळाला आहे. कोणी दुसरीत तर कोणी तिसरीत आहे. दोन मुली माध्यमिक शाळेत आहेत.

एकापाठोपाठ एक सर्व जण गेल्यानंतर अनुसूया यांच्यावर येणाऱ्या अडचणींचा सिलसिला थांबलेला नाही. एकानंतर एक मुले आजारी पडली. त्यांच्या इलाजासाठी फुटकी कवडीही राहिली नाही. घरातील भांडीही विकावी लागली. त्यानंतर वस्तीतील झोपडीही गहाण ठेवावी लागली. रोज दोन वेळच्या खाण्याची भ्रांत. रोज रात्री झोप येत नाही. घरावरचे छप्पर जाऊ नये अशी भीती सतत वाटते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...