आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या छोट्याशा पुढाकाराने असे उजळले बालकांचे चेहरे, गिफ्टमुळे आनंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - ही मुलं आहेत इंदूरच्या झोपडपट्ट्यांमधली. भास्कर समूहाने खूप साऱ्या गिफ्ट्स देऊन त्यांची दिवाळी सार्थक केली आहे.ते इतकी आनंदी आहेत की आतापासूनच तयारीला लागले आहेत. त्यांची तयारी फक्त आपल्यापुरती नव्हे तर संपूर्ण वस्तीसाठी आहे. ते मित्रांसोबत धिंगामस्ती करत भांडत आहेत, काहीसा तोराही मिरवत आहेत. मात्र, ते रागात नव्हे तर आनंद वाटण्यासाठी...

दिवाळीला आम्ही शाळकरी मित्रांना घरी बोलावलंय, मिळून आनंद साजरा करू
आमच्या झोपडपट्टीत बरीच मुलं आहेत. पण गिफ्ट फक्त आम्हालाच मिळालंय. गेल्या वर्षीही दिवाळी साजरी केली होती, फटाकेही फोडले होते. पण इतके सारे नव्हते, फक्त पाचच खरेदी केले होते. यंदा एक खोकंभरून आहेत. नवे कपडेही मिळाले. आम्ही तर तेच पाहत बसतो. झाेपडपट्टीतील अनेक मित्रही ते पाहायला आले. आम्ही आमच्या शाळेत टीचरसह सर्वांना सांगितले. दिवाळीच्या दिवशी आम्ही मित्रांना घरी बोलवू. आम्ही पुढेही खूप अभ्यास करू. मोठे होऊन अधिकारी बनू. तेव्हाच तर इतरांना गिफ्ट देऊ शकू.
- लखन लाखरे व त्याचा भाऊ पवन (इंदुरातील जगजीवनरामनगरात राहणारे)

दोन वर्षांपूर्वी फटाक्यांच्या हट्टापायी उपाशीच झोपलो होताे, यंदा इतरांनाही खाऊ घालेन
माझे बाबा सकाळीच मजुरीवर जातात, उशिरा परततात. त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात. म्हणून मीही कधी महागड्या वस्तू मागत नाही. यंदा तर मागितल्याविना मिळाले. आमची दिवाळी दणक्यात होईल. दोन वर्षांपूर्वी फटाक्यांच्या हट्टापायी उपाशीच झोपलो होतो. यंदा मात्र
इतरांनाही खाऊ घालेन. वस्तीतील इतर मुलेही आमच्यासारखीच आहेत. नवे कपडे मिळाल्याने मीच ते घालेन, फटाके मात्र मित्रांतही वाटेन. मलाही कुणीतरी दिलेले आहेत ना..
- रोहित शंकर (इंदूरच्या चंद्रलोक चौफुली गल्लीत राहणारा)