आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉन को पकडना मुश्किलही नही.. गुन्हेगाराचे थेट फेसबूकद्वारे पोलिसांना आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - राजस्थानातील कुख्यात गुन्हेगार आनंदपाल सिंह याने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य पोलिसांनाच आव्हान िदले आहे. फेसबुकवर त्याने त्याच्या समर्थकांचा एक ग्रुप बनवला असून त्यावर तो पोलिसांसमोर शरण यावे किंवा नाही याचे सल्ले घेत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याबाबत राजस्थान पोलिसांना किंवा सायबर सेलला काहीच कल्पना नाही.

आनंदपाल व त्याच्या समर्थकांनी पोलिसांना खुले आव्हान िदले आहे. “हम आज भी अपने हुनर में दम रखते है. होश उड जाते है के लोक महफिल में कदम रखते है...२१ आयपीएस और ३००० से जादा पुलिसवाले मुझ डॉन के पिछे है. लेकिन मुझे पकडना मुश्किलही नामुमकिन है.’ आनंदपाल यूथ ब्रिगेड नावाने फेसबुवर पेज बनवले आहे. त्याला आतापर्यंत २७,५९० लाइक्स मिळाल्या आहेत. या पेजवर आनंदपालवर ८६,००० पेक्षा जास्त लोक चर्चा करत आहेत.
आनंदपाल फॅन क्लब व आनंदपाल यूथ ब्रिगेड नावाने बनवण्यात आलेल्या या पेजला आतापर्यंत २७,५९० लोकांनी लाइक केले आहे. परंतु या पेजच्या माध्यमातून आनंदपालने ८६ हजारपेक्षा जास्त लोकांसोबत चर्चा केली आहे. त्यावर प्रशासनाच्या प्रत्येक कारवाईची अपडेट पडलेली असते. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या आरोपीच्या नावे बनवण्यात आलेल्या पेजवर हजारो लोक त्यावर कॉमेंट्स करत असून पोलिस मात्र अनभिज्ञ आहेत.

२१ आयपीएस अधिकारी, ३००० पोलिसांना दिले आव्हान
पेजला लाइक करणाऱ्यांची संख्या २८ हजार झाली आहे. आनंदपालच्या पेजवर प्रत्येक अपलोड पोस्टला लाइक करण्यात आले असून त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. प्रत्येक पोस्टला ८० लाइक येतात. आनंदपालही शरण येण्याबाबत त्यांचा सल्ला मागत आहे.
डॉन को पकडना नामुमकिन है!
३ जुलै : हम आज भी हुनर में दम रखते है, होश उड जाते है, लोगों के जब महफिल में कदम रखते है।
२५ जून : आनंदपाल शरण येण्यासाठी तयार आहे, परंतु त्याच्या काही अटी आहेत. सर्व खटल्यांचा तपास सीबीआयद्वारे करावा व त्याच्या सुरक्षेत कोणतीही कसर ठेवली जाऊ नये. जर आनंदपालचा एन्काउंटर झाला तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. सर्व भाईंनी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी.
२३ जून : डॉनला पकडणे कठीणच नाही तर अशक्य आहे! ३००० पेक्षा जास्त पोलिस व २१ आयपीएस अधिकारी या डॉनच्या मागे लागले आहेत. परंतु डॉनचे म्हणणे असे की, मला पकडणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे.
१८ जून : पेजवर २५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून त्याबद्दल सर्व भाईंना मनापासून धन्यवाद.
१७ जून : अडचणी असतातच महान लोकांच्या जीवनात, अन्यथा राम वनात, कृष्ण कारावासात व मी फरार झालो नसतो.
गृहमंत्र्यांच्या पेजला १० हजार, तर आनंदपालच्या पेजला २७ हजार लाइक्स : आनंदपाल यूथ ब्रिगेड पेजला २७,५९० लोकांनी लाइक केले आहे, तर गृहमंत्री गुलाबचंद कटारियांच्या फेसबुक पेजला लाइक करणाऱ्यांची संख्या १०,०४२ आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फेसबूक पेज कसे असते अपडेट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...