आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील 10 महिलांचे गळे चिरुन घेतला गळफास, ठाण्यातील हसनैन प्रकरणाशी साम्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये अंगावर शहारे आणणारी एक घटना घडली आहे. एका कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे. विशेष म्हणजे घरातील सदस्यांनेच कुटुंबातील 10 महिलांची हत्या करून स्वतः फाशी घेतल्याचे दिसून येत आहे. प्राथमिकदृष्ट्या फाशी घेतलेल्या व्यक्तीनेच दहा जणींची गळा कापून हत्या केल्याचे दिसत आहे. या सर्वांचा गळा कापण्यापूर्वी त्यांना काहीतरी औषध पाजण्यात आले होते. 

जमालुद्दीन नावाच्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील 10 महिलांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे घरात असेल्या मुलांना किंवा पुतण्यांना त्याने काहीही केले नाही. केवळ महिला सदस्यांचीच हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी ठाण्यातील हसनैन वरेकरच्या कुटुंबातीलही अशीच घटना समोर आली होती. हसनैने त्याच्या कुटुंबातील 11 जणांची निर्घृण हत्या केली होती. ठाणे आणि अमेठीतील घटनेत बरेच साम्य आहे. कारण दोन्ही घटनांत हत्येपूर्वी विष पाजण्यात आले आहे. तसेच हत्या गळा कापून करण्यात आली आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमकी काय घटना घडली... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...