आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 रु. भाड्याने किल्ला; भाडेकरूची कमाई 8 कोटी रुपये, येथे येतात सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - १२ हजार कोटींची संपत्ती असणारे मारवाडचे माजी राजघराणे सध्या चर्चेत आहे. प्राप्तिकर विभागाने १२३ कोटी रुपयांच्या संपत्ती कराच्या वसुलीसाठी घराण्याची ३० बँक खाती अलीकडेच जप्त केली आहेत. कर वसुलीसाठी माजी राजघराणे आणि प्राप्तिकर विभाग गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहे. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा अनेक रंजक गोष्टी समोर आल्या.
 
 माजी राजघराण्याने संपत्ती कर वाचवण्यासाठी मेहरानगड किल्ला आपल्याच ट्रस्टला शंभर रुपये एवढ्या वार्षिक भाड्याने दिला आहे, असे समजले. त्यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे भाडेकरू असलेले मेहरानगड वस्तुसंग्रहालय विश्वस्त मंडळ याच किल्ल्यापासून दरवर्षी आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहे. हे भाडेही ४२ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते. १९९२ मध्येही जेव्हा भाडे करार झाला तेव्हाही भाडे वाढवण्यात आले नाही.  या किल्ल्याचा मालकी हक्क माजी राजघराण्याकडे आहे, पण ही परिशिष्ट-अ प्रवर्गातील मालमत्ता आहे, तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे ती विकता येऊ शकत नाही.

ट्रस्ट बनवूनच आपल्या मिळकतीत ठेवली जाऊ शकते. त्यामुळेच ट्रस्टने तीन प्रकारे पैसे घेण्यास सुरुवात केली. पहिला परवाना शुल्काद्वारे. म्हणजे किल्ल्यात हस्तशिल्प कलाकारांना जागा देऊन. त्याशिवाय येथे चित्रित होणाऱ्या चित्रपटांपासून चित्रीकरण स्थळ शुल्क वसूल केला जातो. किल्ला डिनर पार्टीसाठीही भाड्याने दिला जातो. शंभर रुपये भाडे असलेला किल्ला भाडेकरूलाच वर्षात आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावून देत आहे.
 
प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, ट्रस्ट मूळ उद्देशापासून दूर होत व्यवसाय करत आहे, त्यामुळे त्यांनी प्राप्तिकरही द्यायला हवा. अर्थात, ट्रस्ट अजूनही कर न भरण्यासाठी तर्क देत आहे. ट्रस्टतर्फे सीए राजीव पांडे यांनी सांगितले की, हस्तशिल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे कलाकारांना जागा दिली जाते.  किल्ला जगभर प्रसिद्ध व्हावा या हेतूने चित्रीकरणाची परवानगी दिली जाते.
बातम्या आणखी आहेत...