आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मभर आई, बहिणीपासून दूर राहून बनल्या जगाच्या 'मदर', वाचा तेरेसांचा जीवनपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्मभर रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या मदर तेरेसांना संतपद बहाल करण्याचा निर्णय पोप फ्रान्सिस यांनी जाहीर केला आहे. मदर तेरेसा या थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या तेरेसांना 'मदर ऑफ द मॅनकाइंड' म्हणून गौरवले जाते. त्यांचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन सुसह्यकरण्याचा त्यांचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मदर तेरेसा, असे समीकरण आहे. संतपद बहाल झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात या अवघ्या गरजवंतांच्या या 'मदर' बद्दल...
मदर तेरेसांचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला होता. त्यांचे वडील किराणामालाचे दुकानदार होते तर आई शेतकऱ्याची मुलगी होती. त्यांचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असतानापासूनच त्या सेवाकार्यांत रस घेत होत्या. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात त्यांनी प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर सन्यास पत्करून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले.
मिशनरी कार्यानिमित्त त्या भारतात तत्कालीन कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाच्या शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. स्पॅनिश साध्वी संत तेरेसाच्या नावाने पुढे त्यांचे नामांतर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे त्या ‘मदर तेरेसा’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी 19 वर्षे अध्यापन कार्य केले. प्राचार्या झाल्या. अध्यापन करत शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे त्यांना अनेकदा दर्शन व्हायचे. त्यामुळे त्यांच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे यांची सेवा करण्याचे विचार येत. पुढे किंबहुना हीच ईशसेवा असा विचार त्यांच्या मनात दृढमूल झाला. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच त्यांना मिळाला. त्यानंतर शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन त्यांनी केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मदर तेरेसांना सहन करावी लागली अवहेलना...
संदर्भ - मराठी विश्वकोष