आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना \'बेशरम\' म्हणणाऱ्या मल्लिका, अडवाणींविरोधात लढल्या होत्या निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या विरोधात टीका केली आहे. मल्लिका साराभाई यांच्या आई आणि प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे गुरुवारी निधन झाले. त्यावर मोदींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे चिडलेल्या साराभाई यांनी ट्विटरवर, मोदींना लाज वाटली पाहिजे, अशा आशयाची पोस्ट केली. पण मल्लिका यांनी मोदींवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मल्लिका साराभाई यांनी यापूर्वीही मोदींवर अनेकदा टीका केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती. गुजरात दंगलींनंतर त्यांनी मोदींवर टीका केली होती.

मोदी सरकारवरील टीका
नरेंद्र मोदींचे नेतृत्वातील सरकार हे केवळ श्रीमंतांचे सरकार असल्याची टीकाही मल्लिका साराभाई यांनी केली होती. समाजातील मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी या सरकारने काहीही केले नसल्याचे साराभाई म्हणाल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मल्लिका साराभाई यांच्या राजकीय प्रवासाबाबत...