आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Members Of Team Anna After 5 Years Of Jantar Mantra Agitation

पाच वर्षांत बदलली स्थिती, अण्णांचा वापर करून या सर्वांनी साधला स्वार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपण सगळे काय करत होतो, असे विचारले तर सहज कोणाच्याही लक्षात येणार नाही. पण आजच्या पाच वर्षांपूर्वी देशामध्ये एक क्रांतीची लाट पसरलेली होती. संपूर्ण देशामध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागले होते. अण्णा हजारे या एका नावाने देशातील सरकारला हादरवून सोडले होते. आजच्या दिवशी जंतर मंतरवर अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जोशात सुरू होते. संपूर्ण देश या आंदोलनात अण्णांबरोबर होताच. पण एका खास टीमच्या जोरावर अण्णांनी हे आंदोलन उभे केले होते. ती टीम मात्र पुढे विखुरली. यातील अनेकांनी अण्णांचा केवळ वापर केला असेही म्हटले जाते.

पाच एप्रिलपासून सुरू झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला असे म्हणणे काहीही वावगे ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे या आंदोलनाचा परिणाम एवढा मोठा होता की देशातील सरकार बदलण्यातही त्याचा मोठा वाटा होता, असे म्हटले जाते. कारण अण्णांच्या आंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या आंदोलनात देशभरात तरुणाई रस्त्यावर उतरली होती. तरुणाईची शक्ती पाहून राज्यकर्त्यांच्या मनात त्यावेळी धडकी भरलेली असणार यात शंका नाही. पाच वर्षांनंतर आज मात्र अण्णा हजारे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत.

या आंदोलनात माजी सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल, पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी आणि माजी लष्करप्रमुख व्ही के सिंह अशी मोठी नावे, या आंदोलनात अण्णांबरोबर जोडली गेली होती. पण या सर्वांनी आता आपला सवता सुभा उभा केला आहे. एकिकडे कोणी पक्ष स्थापन केला तर कोणी लाटेवर स्वार होत, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. चला तर जाणुन घेऊयात टीम अण्णा मधील हे सदस्य कोण होते आणि सध्या ते काय करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, टीम अण्णाचे दोन खांब उभे राहिले एकमेकांविरोधात...