आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या गावात अशा राहतात विदेशी तरुणी, भारतीय तरुणांना NO Entry

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसोलमध्ये असलेल्या इस्रायली महिला. - Divya Marathi
कसोलमध्ये असलेल्या इस्रायली महिला.
चंदिगड - हिमाचलमधील कसोल नावाचे गाव हे इस्रायली पर्यटकांचे प्रथम पसंतीचे स्थळ आहे. इस्रायलमध्ये अनिवार्य सैन्य प्रशिक्षण घेणारे इस्रायली नागरिक या गावात मोठ्या संख्येने येतात. हे इस्रायलमधील एखादे गाव असावे असे वाटते. भारतीय पुरुषांना या गावात प्रवेश करण्यावर बंदी आहे. भारतीय पुरुष आले तरी त्यांना राहण्यासाठी भाड्याने खोल्या मिळत नाहीत.

भारतीय पुरुषांना बंदी असण्याचे कारण...
- या क्षेत्रातील पर्यटन व्यवसायिक भारतीय पुरुषांना गावात येऊ देत नाहीत.
- त्यांच्या मते भारतीय पुरुष इस्रायली महिलांची छेड काढतात आणि त्यांच्या आनंदात अडथळे आणतात.

इस्रायलींची पहिली पसंती का..
- सुमारे दोन दशकांपूर्वी कसोल गाव शोधले होते, असा इस्रायली नागरिकांचा दावा आहे.
- स्थानिक पर्यटकांची संख्या वाढल्याने मनालीतील शांतता कमी झाली त्यानंतर इस्रायली टुरिस्ट एकांत शोधण्यासाठी पार्वती खोऱ्याच्या किनाऱ्यावर वसलेल्या कसोल गावात येऊ लागले.

स्थानिकांचा रोजगार..
- या गावात ड्रग्ज, मस्ती आणि चैन करण्यासाठी सर्व व्यवस्था असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
- या भागाच्या जवळपास असलेल्या गावांमद्ये इस्रायली झेंडेही पाहायला मिळतात.
- सुरुवातीला इस्रायली कसोलमध्ये आले तेव्हा त्यांनी भाड्याने जागा घेतली.
- त्यांनी त्यांचे गेस्ट हाऊस, कॅफे चालवले. स्थानिक लोकांनी त्यांना भाड्याने जागा दिल्या कारण त्यांना रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा होती.

गावात बोलली जाते हिब्रू भाषा...
- येथील इंटरनेट कॅफेमध्ये हिब्रू ही बोलीभाषा आहे.
- इस्रायलींना इंग्रजी फारशी कळत नाही.
- स्थानिक लोक इस्रायलींसाठी तयार केलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये जात नाहीत.
- त्यांच्या मते इस्रायलींचे अन्न वेगळ्या प्रकारचे असते.
- कसोल गावात एकही गाडी नव्हती.
- आता लोक स्वतःचे इंटरनेट कॅफे, गेस्ट हाऊस चालवतात.
- याठिकाणी तीनशे रुपये रोजाने खोल्या भाड्याने मिळतात.
- गावातील नागरिकांची लाइफ स्टाइलही इस्रायलींप्रमाणेच बनली आहे.
- हम्मस, पिझ्झा, ब्रेड हे लोकांचे मुख्य अन्न बनले आहे.
- खबद हाउस म्हणजे यहुदींचे सांस्कृतिक स्थळही आहे.
- या सुंदर इमारतीत लाकडी बेंच आणि फ्लोरींग आहे.
- यहुदींचा एक पुजारीही याठिकाणी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्रायली नागरिक राहत असलेल्या कसोल गावातील PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...