बॉडी बिल्डींग या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व आहे. महिलांचा विचार करता अगदी बोटावर मोजाव्या एवढ्याच महिला या क्षेत्रात प्रवेश करतात. पण त्याही या क्षेत्रात फार पुढे जात नाही. मात्र दिल्लीची राहणारी यशमीन चौहान मनक ही महिला याला अपवाद ठरली आहे. बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या स्पर्धेत मनकने Miss India 2016 किताब जिंकला आहे.
बॉडी बिल्डींगच्या पॅशन बरोबरच मनकने ग्लॅमरही टिकवून ठेवले आहे. तिच्या बॉडी बिल्डींगमध्ये परिश्रण आणि सौंदर्याचा अनोखा मिलाफ आपल्याला पाहायला मिळतो. मनकला मुळात वेटलिफ्टींगची आवड होती. पण गेल्या काही वर्षांत बॉडी बिल्डींगविषयी तिचे आकर्षण वाढले आणि तिने यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घाम गाळून तिने पिळदार शरिर कमावले आणि अनेक स्पर्धांमध्ये नाव कमावत बॉडी बिल्डींगची मिस इंडिया बनली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वजन कमी करण्ययासाठी सुरू केले जिमिंग, मित्र मारायचे टोमणे.. असा मिळवला परफेक्ट शेप..
अखेरच्या स्लाइड्सवर पाहा मनकच्या परफॉर्मन्सचा VIDEO..