आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवाज बंद होईपर्यंत तोंड दाबून मित्र करत होते वार, वाचा काय म्हणाला होता पत्नीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीबरोबर वरुण दुसऱ्या फोटोत हत्येनंतर अशाप्रकारे शेतात सापडला होता मृतदेह. - Divya Marathi
पत्नीबरोबर वरुण दुसऱ्या फोटोत हत्येनंतर अशाप्रकारे शेतात सापडला होता मृतदेह.
जालंधर - वरुण अरोरा मर्डर केसचा गुंता सोडवण्यात पोलिसांना 24 तासांत यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 35 वर्षांच्या वरुणची हत्या एखाद्या मास्टरमाइंडने नव्हे तर त्याचा मित्र अतुलनेच केली होती. अतुलला वरुणकडून चिट्‌टे (एक प्रकारची नशा) चे 15 हजार रुपये घ्यायचे होते. हत्येनंतर वरुणच्या घरात लुटालूट करण्यात आली होती. परत आल्यानंतर फिरायला जाऊ असे वरुण पत्नीला सांगून गेला होता.

हत्येसाठी वापरलेला चाकू आणि कोयता सापडला..
- पोलिसांनी अतुल आणि एक इतर आरोपी साहीलच्या तपासासाठी शोध घेत आहेत. वरुणला रात्रीच्या वेळी बोलावून त्याच्या शरीरावर मरेपर्यंत वार करण्यात आले होते.
- पोलिस कमिश्नर अर्पित शुक्ला म्हणाले की, वरुणच्या पत्नीने तो घरातून निघताना फोनवर बोलला असल्याचा उल्लेख केला होता.
- त्या दिशेने शोध घेतला त्यावेळी तो नंबर स्वराज नावाच्या एका मजुराच्या नावावर असल्याचे समोर आले.
- पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत तो फोन ट्रेस करत चौकशी केली. त्यावेळी 25 ऑगस्टला हा फोन चोरी झाल्याचे समोर आले होते. - त्याच फोनने 45 दिवसांनंतर वरुणला कॉल करण्यात आला होता.
- पोलिसांनी आरोपी शिव प्रकाश आणि साहीलला अटक करून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि कोयता जप्त केला आहे.

आवाज थांबेपर्यंत करत राहिले वार..
- समोर आलेल्या माहितीनुसार वरुण येताच, अतुलने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याचा आवाज बंद होईपर्यंत ते त्याच्यावर वार करत राहिले.
- पोलिस आयुक्त म्हणआले, अतुलला वरुणकडून 15 हजार रुपये घ्यायचे होते. वरुणचे नवे नवे लग्न झाले होते, त्यामुळे त्याच्याकडे पैसा आणि दागिने असतील हे अतुलला माहिती होते.
- त्यामुळे त्यांनी कट रचून वरुणला फोन करून बोलावले होते. त्याला नशा करण्यासाठी बोलावले असल्याचे सांगण्यात आले होते.
- अतुल आणि फरार साहीलने वरुणच्या डोक्यावर मागून वार केले. खाली पडताच वरुण ओरडू लागला.
- त्याचवेळी बॅटरीचा प्रकाश पडला. त्यामुळे शिवाने वरुणचे तोंड दाबले. पण तो ओरडणे थांबवत नव्हता.
- अखेरच चाकू आणि बर्फ तोडण्याच्या टोचाने वरुणच्या शरीरावर तो मरेपर्यंत त्यांनी वार केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा केली वरुणची हत्या..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...