आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्‍येच्‍या आरोपात जावे लागले होते सिद्धूंना तुरूंगात, दिला होता खासदारकीचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- खेळाचे मैदान असो किंवा राजकारण नवज्योतसिंग सिद्धू यांचा चेहरा नेहमी हसरा असतो. 20 ऑक्‍टोबरला सिद्धू यांचा वाढदिवस आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणुन घ्‍या, सिद्धूंच्‍या जिवनातील एक असा प्रसंग, जेव्‍हा त्‍यांना जेलमध्‍ये जावे लागले होते. त्‍यामुळेच त्‍यांना संसदेतील सदस्‍यत्‍वही गमवावे लागले.
सिद्धूंना एका व्‍यक्‍तीच्‍या हत्‍येप्रकरणी आरोपी ठरवण्‍यात आले होते. त्‍यांना पटियाला पोलिसांनी अटक करून तुरूंगातही पाठवले होते. एका व्‍यक्‍तीच्‍या हत्‍येमध्‍ये सहभागी असलेल्‍या मुख्‍य आरोपीला मदत केल्‍याचा आरोप सिद्धूंवर होता. सिद्धूंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तेव्‍हा त्‍यांनी लोकसभेतील सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला होता व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2004 मध्‍ये जिंकले होते निवडणूक
एका व्‍यक्‍तीच्‍या हत्‍येचे हे प्रकरण 1988 मधले आहे. सिद्धूंनी भाजपाच्‍या तिकीटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून 2004 मध्‍ये निवडणूक जिंकली होते व ते खासदार बनले होते. तेव्‍हा त्‍याच्‍या विरोधात असलेल्‍या जुन्‍या केसची फाइल उघडण्‍यात आली होती. डिसेंबर 2006 मध्ये न्यायालयात त्‍याचा खटला चालला. सिद्धूंना हत्‍येच्‍या प्रकरणात दोषी ठरवून तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्‍यानंतर त्‍यांना कित्‍येक दिवस पटियाला तुरूंगात काढावे लागले.
राजकारणात पुनरागमन
सिद्धूंने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्‍यानंतर कोर्टाने त्‍यांना फेब्रुवारी 2007 मध्‍ये पुन्‍हा अमृतसर लोकसभेत निवडणूक लढवण्‍यासाठी परवानगी दिली होती. 2007 मध्‍ये झालेल्‍या उप-निवडणूकीत त्‍यांनी सत्‍ताधारी कॉंग्रेसचे पंजाबमधील माजी मंत्री सुरिन्दर सिंगला यांना पराभूत केले होते. 2009 च्‍या सर्वसाधारण निवडणूकीत त्‍यांनी कॉंग्रेसचे ओम प्रकाश सोनी यांचा पराभव करून अमृतसरमध्‍ये तिस-यांचा विजय मिळवला होता.
शाकाहारी सिद्धू
नवज्योतसिंग सिद्धू यांचा जन्म पंजाबमधील पटियाला जिल्‍ह्यात झाला. सिद्धू पंजाबी असूनही ते पूर्ण शाकाहारी आहेत. विशेष म्‍हणजे त्‍यांच्‍या पत्‍नीचे नावही नवजोत आहे. त्‍या व्‍यवसायाने डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्‍या मुख्य संसदीय सचिव आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सिद्धूंचे राजकीय करियरमधील काही खास फोटो..