आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Navjyot Singh Siddhu And His Entry In Indian Team

रोज 300 सिक्सरचा सराव, हात व्हायचे रक्तबंबाळ..अशी झाली भारतीय संघात निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवज्योतसिंग सिद्धू हे भारतीय क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिद्ध असे नाव आहे. विश्वचषकामध्ये सलग पाच अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम सिद्धूच्या नावावर असून जवळपास गेल्या 30 वर्षांमध्ये कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही. पण नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड अगदी सहज झालेली नाही. त्यांना संघात संधी मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले होते.
मैदानावर दिवस दिवसभर घाम गाळून सिद्धू सराव करायचे. अनेक अडचणी आल्यानंतरही सर्वांचा सामना करत सिद्धू यांनी मेहनतीच्या जोरावर संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले. त्याकाळच्या इतर मुलांप्रमाणेच अगदी लहानपणापासूनच सिद्धू यांच्या मनात क्रिकेटर व्हायची इच्छा होती. पण क्रिकेटपटू बनले तरी त्याकाळीही संघात स्थान मिळवणे अगदीच सोपे नव्हते. अशाच सिद्धू यांच्या वर्ल्ड कप टीममधील प्रवेशाची कथा फार प्रेरणादायी आहे. या क्षेत्रात येणाऱ्या किंवा कोणत्याही क्षेत्रातील तरुणांनी आदर्श घ्यावा अशी ही सिद्धू यांची कथा आहे. नुकतीच सिद्धू यांची राज्यसभेवर नियुक्तीसाठी झाली आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या प्रसंगाबाबत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, वडिलांचे अश्रु पाहून केला निर्धार... रात्र रात्र भर लाईट लावून घरामागे करायचे सराव...