आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WHAT NEXT: तामिळनाडूत राजकीय अनिश्चितता, अशी राहू शकतात पुढील समिकरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  व्ही. के. शशिकला आता 10 वर्ष मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेला 4 वर्षांच्या शिक्षेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. त्यानंतरही 6 वर्षे मुख्यमंत्रीपदी विराजमान होता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे शशिकलांचे राजकीय करिअर संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे आता केवळ सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा एकमेव मार्ग आहे. दुसरीकडे  काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम राजीनामा मागे घेऊ शकतात.
 
प्रश्नोत्तराद्वारे जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... 

1) कोणत्या प्रकरणी सुनावली शिक्षा?
- 1996 मध्ये तत्कालीन जनता पार्टीचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी जयललितांवर 1991 ते 1996 पर्यंत मुख्यमंत्री असताना 66.44 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा खटला दाखल केला होता. 
- जयललिता, शशिकला आणि इतर दोघांनी 32 कंपन्या स्थापन केल्या पण त्यांचा काहीही व्यवहार नव्हता. या कंपन्या केवळ काळ्या पैशातून प्रॉपर्टी खरेदी करायच्या. 
- या प्रकरणाची सुनावणी तमिळनाडूबाहेर बेंगळुरूच्या स्पेशल कोर्टात झाली. त्यात कोर्टाने 27 सप्टेंबर 2014 रोजी जयललिता, शशिकला आणि इतर दोघांना दोषी ठरवले. त्यांना चार वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड सुनावण्यात आला होता. 
- पण मे 2015 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने सर्वांना निर्दोष मुक्त केले होते. कर्नाटक सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केले. सुप्रीम कोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. 

2) शशिकलांसाठी काय आहे निर्णयाचा अर्थ?
- सुप्रीम कोर्टाने शशिकला यांना 4 वर्षाच्या शिक्षेचा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यात त्यांना उर्वरित साडे तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. 
- पब्लिक रिप्रेझेंटेशन अॅक्टनुसार कोणतीही व्यक्ती दोषी ठरवल्यानंतर कोणत्याही शासकीय पदावर राहता येत नाही. 
- 4 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही 6 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. 
- त्यामुळे 10 वर्षे शशिकला यांना मुख्यमंत्री बनता येणे शक्य नाही. 

3) शशिकलांकडे असलेले पर्याय कोणते?
- शशिकला सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करू शकतात. बेहिशेबी मालमत्ता जमावण्यासाठी जयललितांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. याच मुद्द्यावर पुन्हा रिव्हयू पिटीशन दाखल करून त्या पुन्हा खटला दाखल करू शकतात. 

4) सुप्रीम कोर्टात दिलासा मिळेल का?
- हे सांगणे कठीण आहे. लालू प्रसाद यादव जेव्हा चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरले होते तेव्हा, सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधातील निर्णय कामय ठेवला होता. त्यानंतर त्यांना निवडणूक लढवता आली नाही. 

5) आता शशिकला काय करणार?
शशिकला AIADMK च्या प्रमुख आहेत. या पोस्टवर त्या राहू शकतात. पण पन्नीरसेल्व्हम त्याला कोर्टात आव्हान देऊ शकतात. शशिकला स्वतः मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. पण पन्नीरसेल्व्हमऐवजी त्या त्यांच्या विश्वासू आमदाराला मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करू शकतात. 

6) पन्नीरसेल्व्हम काय करतील?
- पक्षाच्या आमदारांनी शशिकला यांना पाठिंबा दिल्यानंतर पन्नीरसेल्व्हम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. ते राजीनामा परत घेऊन मुख्यमंत्रापदावर कायम राहू शकतात. पण त्यासाठी त्यांना पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा लागेल. 

7) स्टॅलिन काय करतील? 
- डीएमकेचे नेतृत्त्व सध्या स्टॅलिन यांच्याकडे आहे. त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. शशिकला यांच्या गटाने पन्नीरसेल्व्हमना पाठिंबा दिला नाही तर ते स्टॅलिनची मदत मागू शकतात. स्टॅलिन पन्नीरसेल्व्हमना पाठिंबा देऊन सत्ता मिळवण्याचा विचार करू शकतात. पण आता बदललेली समिकरणे बघता एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळवत स्टॅलिन मुख्यमंत्रीपदीही विराजमान होऊ शकतात.

8) केंद्र आणि राज्यपालांची भूमिका? 
- अॅटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना कालच तमिळनाडू विधानसभेत आठडाभरात फ्लोअर टेस्ट घेण्याचा सल्ला दिला होता. 
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजूनही परिस्थिती 'जैसे थे' आहे. पन्नीरसेल्व्हम यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी फ्लोअर टेस्टचा सामना करावाच लागणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...