आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राष्ट्रवादी\'चे सहसंस्थापक होते हे प्रसिद्ध नेते, यामुळे दिली होती पक्षाला साेडचिठ्ठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पी. ए. संगमा आणि शरद पवार. - Divya Marathi
पी. ए. संगमा आणि शरद पवार.
नवी दिल्ली/मुंबई - माजी लोकसभा अध्यक्ष आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री दिवंगत पी. ए. संगमा यांची 1 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. राष्ट्रवादीचे सहसंस्थापक राहिलेल्या संगमा यांनी राष्ट्रपतिपदासाठी तडजोड करण्यास नकार देऊन शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. हरहुन्नरी, अभ्यासू आणि तितकेच बंडखोर व्यक्तिमत्त्व असलेले संगमा यांची तशी सर्वसाधारण कौटुंबिक पार्श्वभूमी होती. परंतु राजकारणात आपल्या नेतृत्व गुणामुळे त्यांनी वेगळी उंची गाठली होती. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com ने त्यांच्याशी निगडित काही बाबींवर टाकलेला हा प्रकाश...

अशी राहिली कारकीर्द
- 1 सप्टेंबर 1947 रोजी मेघालयात जन्म झालेल्या पी. ए. संगमा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसंस्थापक होते. शरद पवार यांनी तारिक अन्वर व पी. ए. संगमा यांच्यासह एनसीपीची स्थापना केली होती. 4 मार्च 2016 रोजी दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
- संगमा हरहुन्नरी तसेच उच्चशिक्षित राजकारणी म्हणून ओळखले जायचे. त्यांचे पूर्ण नाव पूर्णो अगिटोक संगमा (पी.ए.संगमा) असे होते. शिलाँगमधून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी आसामच्या डिब्रूगड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एलएलबी केली.
- 1973 मध्ये ते युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1975 ते 1980 पर्यंत प्रदेश काँग्रेस समितीचे ते महासचिवही होते.
- 1977 च्या लोकसभा निवडणुकीत तुरा मतदारसंघातून विजय मिळवून पहिल्यांदा खासदार बनले आणि 14 व्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सातत्याने विजयी होत राहिले.
- 1980-1988 पर्यंत केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर कार्यरत राहिले.
- 1988 ते 1991 पर्यंत त्यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
-अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 11व्या लोकसभा निवडणुकीत संख्या कमी असल्याने भाजपला काँग्रेस उमेदवार संगमा यांना लोकसभा अध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते. तथापि, हे सरकार फक्त 13 दिवसच सत्तेत राहिले.
 
सोनिया गांधींना विदेशी म्हणून केली होती बंडखोरी
1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांत संगमाही सामील होते. त्यांनी शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्यासह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (एनसीपी) स्थापना केली. नंतर संगमा एनसीपी सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. यानंतर संगमा यांनी तृणमूल काँग्रेस सोडून स्वत:च्या नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 16व्या लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला. 2012 मध्ये संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांच्याविरुद्ध भाजपचे अधिकृत उमेदवार बनले.
-ते 1988 ते 1990 पर्यंत मेघालयाचे मुख्यमंत्री होते तसेच 1990 ते 1991 पर्यंत विधानसभेत विरोधकही होते. 
 
राष्ट्रपतिपदामुळे 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी
संगमा एनसीपीचे संस्थापक सदस्य होते, परंतु जुलै 2012 मध्ये एनसीपीतून बहिष्कृत केल्यानंतर त्यांनी जानेवारी 2013 मध्ये नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली होती.
राष्ट्रपतिपदासाठी अडून बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. बहुमुखी प्रतिभेचे धनी असलेल्या संगमा यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन आपल्या गटाला राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस नाव देऊन त्याचे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनी त्यांना मरणोपरान्त पद्म पुरस्कार प्रदान केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दिवंगत नेते पी.ए. संगमा यांचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...