आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महालात आहे 'टायगर'ची कबर, येथेच झाला होता सैफ-करिना यांचा विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - हरियाणामधील गुड़गावपासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या पतौडीमध्ये असलेला हा महाल पतौडी कुटुंबाची निशाणी आहे. पतौडीचे नववे नवाब मन्सूर अली खान उर्फ टायगर यांनी त्याला एखाद्या 4 स्टार हॉटेलचे रुप दिले होते. त्यानंतर अनेक चित्रपटांचे शुटिंग आणि सैफ करिनाच्या विवाहासंदर्भात हा महाल चर्चेत होता. आज टायगर पतौडी यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आम्ही या महालाबाबत माहिती देत आहोत.

पतौडी कुटुंबाचा इतिहास हा 200 वर्षे जुना आहे. पण या महालाला तयार होऊन केवळ 80 वर्षे झाली आहेत. 1935 मध्ये आठवे नवाज आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसेन सिद्दकी यांनी हा महाल बांधला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि नववे नवाब मन्सूर अली उर्फ नवाब पतौडी यांनी परदेशी आर्किटेक्टच्या मदतीने त्यात बदल केले.

पतौडी यांच्या मृत्यूनंतर त्यांची सून आणि सैफ अली खान यांची पत्नी करीना या महालाची काळजी घेत आहेत. या महालामध्ये मंगल पांडे, वीर-झरा आणि रंग दे बसंती अशा अनेक मोठ्या चित्रपटांचे शुटिंगही झाले आहे. या महालात भव्य ड्रॉइंग रूमशिवाय सात बेडरूम, ड्रेसिंग रूम आणि बिलियार्ड रूमही आहे. महालाचे डिझाईन राजेशाही थाटाप्रमाणे आहे.
पॅलेसमध्ये सैफिनासाठी वेगळा शेर महाल
सैफिनासाठी पतौडी पॅलेसमध्ये खोली क्रमांक आठ म्हणजेच शेर महाल तयार केला होता. ही खोली सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाच्या पूर्वी तयार करण्यत आली होती. नुकताच दोघांनी याठिकाणीच लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता.

करीनाने केले रिनोव्हेशन
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानला पटौदी महालाचे खास आकर्षण आहे. जेव्हाही तिचे मन अशांत असते किंवा सैफ बरोबर काही वेळ एकांतात राहायचे अशेल तेव्हा ती याठिकाणी येत असते. काही दिवसांपूर्वीच तीने शर्मिला टागोर यांच्या बरोबर या महालाचे रिनोव्हेशन केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पतौडी पॅलेसचे PHOTO