आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातवी पास शेतकरी अन् तयार केले जलसिंचनासाठी टर्बाइन, 50 एकरांत सिंचन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद - मध्य प्रदेशातील सिवनी माळवा विकासखंडातील एक गाव निरखी. इथे राहतात एक प्रयोगशील शेतकरी मदनलाल रघुवंशी. ते आठवी नापास आहेत. पण गावात आता ते सर्वांचे रोल मॉडेल होत चालले आहेत. याचे कारण हे आहे की, त्यांनी शेताच्या सिंचनासाठी एक टर्बाइन (हवा-पाण्याच्या साहाय्याने चालणारे चक्र) बनवले आहे. हे तयार करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. साधारणत: १० लाखांचा खर्च आला. याद्वारे आता ते ५० एकर शेतीचे जलसिंचन याबरोबरच या टर्बाइनद्वारे निर्माण झालेल्या विजेद्वारे १० अश्वशक्तीची मोटारही ते चालवत आहेत. आता त्यांना न डिझेलच्या वाढत्या किमतींची चिंता आहे न की, विजेची. त्यांच्यासाठी आता शेती भार नव्हे, तर प्रयोग व अधिक उत्पन्नाचे साधन झाली आहे. त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ या. स्वत: मदनलाल यांची कहाणी...

४० क्विंटल लोखंडाने टर्बाइन बनवले : माझे कुटुंब शेतीवरच निर्भर आहे. आमच्या भागात पाणी तर आहे मात्र जलसिंचनासाठी पुरेशा प्रमाणात वीज मात्र मिळत नाही. डिझेलवर सिंचन करण्याने पिकांचा उत्पादनखर्च एवढा वाढतो की, हातात काहीच येत नाही. गोष्ट जानेवारी २०१४ ची आहे. मी काही कामानिमित्त तवा बांधावर गेलो होतो. तिथे मी टर्बाइनच्या मार्फत वीज निर्मिती होताना पाहिले. बस तिथेच माझ्याही डोक्यात ही कल्पना सुचली की आपणही असे करावे. माझ्या शेतात तर नेहमीच पाणी वाहते. पण तिथे टर्बाइन लावणे सहज सोपे नव्हते. कारण जिथे टर्बाइन लावायचे तिथे सतत पाण्याचा अखंडित प्रवाह असतो. बर तिथे पोहोचायला वाटदेखील नाही. कंबरेपर्यंतचे खोल पाणी त्यात मी लोखंड सिमेंट, गिट्टी आणी वाळू (रेती) टाकून हा भराव नदीच्या तोंडापर्यंत नेला. पहिले नदीतील वाहत्या पाण्यातील पाया पक्का केला आणि मग त्यावर ४० क्विंटल लोखंडाने टर्बाइन बनवले त्यामधील दाबासह पाणी काढण्यासाठी एक बांध तयार केला. गेल्या २५ डिसंंेबरलाच बांध आणि टर्बाइन तयार झाला. मात्र यात बराच कालावधी गेला पण इथपर्यंत वाट असती तर हे काम यापूर्वीच झाले असते.

टर्बाइनला फिरवण्यासाठी मी त्यांच्या दोन्ही बाजूंनी सिमेंटच्या भिंती बांधल्या. बांधामधून सोडलेले पाणी टर्बाइनमधूनच पुढे जाते. पाण्याच्या या नैसर्गिक वेग व दाबाने टर्बाइन फिरू लागते. यालाच शाफ्टशी जोडले आहे व शाफ्टला गिअर बॉक्सने. गिअर बॉक्स गुणात्मक वाढ करीत टर्बाइनचे फेरे राऊंड प्रति मिनिटाला (आरपीएम) वाढवतो. वॉटर पंप (पाण्याचा पंप) जोडल्यावर पाणी शेतात पोहोचू लागते. अल्टिनेटर जोडल्यामुळे विजेची निर्मिती होते.

५० एकरांत करतात सिंचन व वीजही बनवतात
प्रथम १० एकर जमिनीचे विजेने सिंचन करण्यास २५ दिवस लागत होते, तर डिझेल पंपाने १६ ते १८ दिवस लागायचे. ३० हजार रुपयांचे डिझेलही जळत होतेच. या वेळी ४ दिवसांतच १० एकर जमिनीचे सिंचन झाले. टर्बाइनच्या विजेने नदीपासून दूर असलेल्या शेतातील ट्यूबवेलची मोटारही चालवली. तिथल्याही शेतजमिनीचे सिंचन झाले आणि काहीही खर्च करावा लागला नाही. - मदनलाल