आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुला-मुलींच्या आवडीसाठी दोन देशांच्या कुटुंबांनी केली मुलांची अदलाबदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रघुनाथ मुखर्जी आणि मॅथियास पत्नी, मुलगा व मुलीसोबत. - Divya Marathi
रघुनाथ मुखर्जी आणि मॅथियास पत्नी, मुलगा व मुलीसोबत.
रायपूर - या मैत्रीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. एक मित्र मॅथियास मेटिंग जर्मनीचा, त्याला दोन मुली आहेत. एक मित्र रघुनाथ मुखर्जी, त्याचा मुलगा आहे. मॅथियास यांना मुलाची आवड होती आणि रघुनाथ यांना मुलीची.
अनेक वर्षांपासून दोन्ही मित्रांच्या मनात ही इच्छा होती. एक दाेन वेळा या दोन मित्रांनी एक दुसऱ्याजवळ इच्छा व्यक्त केली होती. रघुनाथ यांनी आपल्या मुलाला काही काळासाठी मॅथियास यांच्याकडे पाठवले आणि आता रघुनाथ यांच्याजवळ मॅथियास यांची मुलगी लहानाची मोठी होत आहे. सध्या हे दोन्ही कुटुंब रायपूरमध्ये एका कार्यक्रमात भेटले, तेव्हा ही हकीगत समोर आली आहे. मॅथियास जर्मनीत लेखक आणि पत्रकार आहेत. तर रघुनाथ मुखर्जी शिक्षक आहेत. हे असे दोन मित्र आहेत, जे आपली मैत्री झाल्यापासून सुमारे पाच सहा वर्षांनंतर भेटले आहेत. मैत्रीचे माध्यम बनले पत्र. १९८३ ते ८४ मध्ये रघुनाथ येथे काॅलेजमध्ये शिकत होते आणि मॅथियास जर्मनीच्या काॅलेजमध्ये शिकत होते. रघुनाथ यांनी हंगेरीच्या एका मॅगझिनसाठी एक आर्टिकल लिहिले होते. मॅथियास यांना ते इतके आवडले की त्यांनी रघुनाथ यांना पत्र लिहिले. पत्राच्या या माध्यमातून मैत्री घट होत गेली. दोघांनी भेटण्याची योजना बनवली. परंतु रघुनाथ यांच्याजवळ इतके पैसे नव्हते. तेव्हा मॅथियास हे रघुनाथ यांना भेटायला १९८९ मध्ये भारतात आले.

या दरम्यानच त्या दोन मित्रांचे लग्न झाले. मॅथियास यांना दोन मुली तबिया आणि मेल्स झाल्या. तर रघुनाथ यांना दिब्यो नावाचा मुलगा झाला. या दरम्यान दोन्ही कुटुंबांचे संबंध दृढ झाले.

सुमारे चार वर्षांपूर्वी मॅथियास यांनी रघुनाथ यांना बोलताना म्हटले होते की, मला मुलगा आवडतो. परंतु आता कुटुंब वाढवण्याची काहीच योजना नाही. असे रघुनाथ यांना अनेकदा मॅथियासने म्हटले होते. शेवटी एक दिवस रघुनाथ यांनी म्हटले, तू मुलगा आणि मुलीची आवड पूर्ण कर. परंतु मला मुलीच आवडतात आणि मी मुलगा आणि मुलगी एक सात पाहू शकत नाही. बस, मग काय हवे होते. त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि एकमेकांची मुले अदलाबदल केली.

बातम्या आणखी आहेत...