आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of A Railway Which Did Not Reached On Its Destination

धाव धाव धावली, तरी दिल्लीत नाही पोहोचली, अख्खी रेल्वेच बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली - नियमित वेळेनुसार निघालेली बरौनी (बिहार) -दिल्ली रेल्वे शुक्रवारी अचानक बेपत्ता झाली आणि दिल्लीपर्यंतच्या स्टेशन मास्तरांच्या तोंडचे पाणी पळाले. गाडी तर निघाली, मग गेली कुठे? बरेली जंक्शनपासून लखनऊ, मुरादाबाद आणि गोरखपूरपर्यंत खळबळ उडाली. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गावर सर्वच स्टेशनवर प्रवाशांना तोवर तिकिटेही देण्यात आली होती. शेवटी कळाले की, ही रेल्वेच निघाली नव्हती. यामुळे स्टेशन मास्तरांचा जीव भांड्यात पडला.

सायंकाळी चार वाजता ही रेल्वे बरेली स्टेशनवर हवी. मात्र, स्टेशनवर काही सूचना नाही आणि घोषणाही नाही. प्रवासीही बेचैन झाले. शेवटी प्रवाशांनी गोंधळ सुरू केला आणि रेल्वेचा माग काढण्याचे काम सुरू झाले. उलटमार्गाने फोनसारख्या माध्यमातून तपास करत करत अधिकारी जेव्हा बरौनीपर्यंत पोहोचले तेव्हा कळाले की ही रेल्वे फक्त १२ एप्रिल ते २७ जून या काळातच चालवण्यात आली होती. नंतर बंद झाली. मात्र, बंद झाल्याची माहिती ना कोणत्या स्टेशनला कळवली, ना प्रवाशांना.

वेबसाइटवरही माहिती नाही
बरौनी-दिल्ली (०४४०९) ही रेल्वे २७ जूननंतर बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वेबसाइटवरही देण्यात आलेली नव्हती. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी यंत्रणेत माहिती दिलेली होती की रेल्वे बरौनी स्टेशनवर उभी आहे. दुसरीकडे रेल्वेची माहिती देणाऱ्या साइटवर मात्र रेल्वे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

रनिंग स्टेशन्सच्या साइटवरही घोळ
बरौनी-दिल्ली रेल्वेच्या मार्गावरील स्टेशनची माहिती देणाऱ्या साइटवरही याबाबत काही माहिती नव्हती. एवढ्यावर हा घोळ थांबत नाही. बरेली स्टेशनवर वेळापत्रकात चक्क या रेल्वेची वेळ सायंकाळी ४ ची नमूद होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वे गेली तरी कुठे?
या रेल्वेच्या मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर स्टेशन मास्तरांनी रेल्वेचे लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरे कोडे उलगडले. सायंकाळी उशिरा सर्वच स्टेशनला माहिती देण्यात आली की ही रेल्वे तर २७ जूनलाच बंद झालेली आहे.