आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी श्रीमंत नाही, पण दु:ख विकत घेऊ शकतो, फ्रीडम-२५१ मोबाइल बनवणा-याची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - ‘मी श्रीमंत नाही, ही खरी गोष्ट आहे. परंतु कोणी आपलेसे केले तर त्याचे दु:ख विकत घेऊ शकतो,’ ही फेसबुक पोस्ट आहे जगातील सर्वात स्वस्त मोबाइल लाँच करणाऱ्या २९ वर्षीय मोहित गोयल यांची. ३० जुलै २०१४ राेजी त्यांनी पोस्ट केली होती. तेव्हा त्यांचे मोजकेच फेसबुक फ्रेंड्स होते. मात्र दोनच वर्षात सर्वकाही बदलले आहे. मोहित रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत. फेसबुक फ्रेंड्सची संख्या हजारांवर गेली आहे. त्यांच्या फ्रीडम- २५१ मोबाइलची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.

कधीकाळी वडिलांसोबत किराणा दुकान चालवणारे मोहित फेसबुकवर खूपच सक्रिय असायचे. मित्र त्यांना ‘क्यूट मोहित’ म्हणायचे. गिटार व स्विमिंगचा छंद असलेले मोहित कायम रोमांचक संदेश पोस्ट करायचे. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हूं, समझ में नही.’ त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गढीपुख्ताचे रहिवासी आहे. वडील राजेश गोयल यांचे शामलीमध्ये रामजी नावाचे किराणा दुकान आहे. मोहित यांचे प्राथमिक शिक्षण शामलीच्या सेंट आरसी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. मोहितने नोएडास्थित अॅमिटी विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तीन वर्षांपूर्वीपर्यंत मोहित शामलीतच वडिलांसोबत किराणा दुकानात बसत होते. मोहितने याच महिन्यात नोएडाच्या धारणाशी विवाह केला. ती रिंगिंग बेल्सची सीईओ आहे. ‘बालपणापासूनच नाव होईल असे काम करीन, असे तो म्हणत असे. एक महिन्यापूर्वी तो शामलीत आला तेव्हा कंपनी सुरू करायची म्हणत होता. मी त्याला आर्थिक मदत केली,’ असे माेहितचे वडील राजेश सांगतात. मोबाइलबाबतच्या शंकांवर राजेश म्हणतात की, ‘घोटाळ्याची शंका घेणे निरर्थक आहे.’

पुढे वाचा, रामजी... दुकान बनले आकर्षणाचे केंद्र