आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शीख गुरुंचा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिरच्‍छेद झाला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगरेटा त्यांचा शिर घेऊन चंडीगडजवळील नाहटा साहिबमध्‍ये येथे आला होता. - Divya Marathi
रंगरेटा त्यांचा शिर घेऊन चंडीगडजवळील नाहटा साहिबमध्‍ये येथे आला होता.
चंडीगड - आज शीखांचे 9 वे गुरु तेग बहादूरजींचा शहीद दिवस आहे. यानिमित्त तुम्हाला त्यांचा शहीदी पर्व आजही पंजाबमध्‍ये हिंदू शीख एकतेचे प्रतिक कसे बनले याविषयी सांगणार आहोत.
हिंदुंना सक्तीने मुस्लिम होण्‍यापासून रोखले
औरंगजेबाने हिंदूंना जबरदस्तीने मुस्लिम बनवण्‍याच्या मोहिमेवर गुरु तेगबहादूर यांनी आपल्या हुताम्याने रोखले. त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा गोविंद. यांनी खालसा पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांना गुरु गोविंदसिंग असे संबोधले जाऊ लागले. सध्‍या तुमच्यापेक्षा पवित्र आत्म दुसरा असू शकत नाही, असे गोविंद यांनी पित्याला सांगितले. हुतात्म्यासाठी त्याने त्यांना प्रवृत्त केले होते. मुस्लिम बनण्‍यास नकार दिल्याने 24 नोव्हेंबर 1675 मध्‍ये गुरु साहिब यांचा शिरच्‍छेद करण्‍यात आला. ते हुतात्मे झाले. त्यांचे शिर घेऊन रंगरेटा दिल्लीहून आनंदपूर साहिबला गेला आणि चंडीगडजवळ एका फकीराच्या झोपडीत रात्री थांबला. येथे गुरुद्वारा नाहटा साहिब आहे.
काश्‍मीर पंडितांचे धर्मांतर
औरंगजेब हिंदूंना सक्तीने मुस्लिम बनवत होता. घाबरलेल्या काश्‍मीर पंडितांनी गुरु साहिबांकडे मदतीची याचना केली. यावर ते म्हणाले, कोणत्या तरी महान आत्म्याच्या बळीची आवश्‍यकता आहे. जवळ उभा असलेल्या मुलांने सांगितले, की सध्‍याच्या घडीला तुमच्या इतका महान आत्मा कोणीही नाही. जर तुम्ही शीख गुरुला मुस्लिम बनवले तर आम्ही सर्व मुस्लिम धर्म स्वीकारु, असे गुरु तेग बहादूरजींनी काश्‍मीरी पंडिताना औरंगजेबाला सांगण्‍यास सांगितले. त्यांनी गुरुंचे ऐकले.
मुस्लिम धर्म न स्वीकारल्याने केला शिरच्‍छेद
गुरु साहिब यांना मुस्लिम बनवण्‍यासाठी त्यांच्या बरोबर आलेल्या शीखांचा छळ झाला. त्यांचे शरीराचे तुकडे केले गेले. अशी अनेक अमानवी कृत्य झाली. पण ना शीख घाबरले, ना शीखांचे गुरु. यानंतर गुरु तेगबहादूरजींचे शिरच्‍छेद केले गेले. दिल्लीत ज्या भागात ही घटना घडली तेथे आज गुरुद्वारा शीश गंज साहिब आहे. येथून रंगरेटा त्यांचे शिर घेऊन आनंदपूर साहिबच्या दिशेने पळाला. चंडीगडजवळ थांबले जिथे गुरुद्वारा नाहटा साहिब आहे. आनंदपूर साहिबमध्‍ये गुरु गोविंदसिंगजींनी शिरावर अंत्य संस्कार केले.
छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा ...