आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाबकाचे फटके, अन्नालाही तरसवले; वाचा, सौदीतून आलेल्या तरूणांची आपबिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - सौदी अरेबियाच्या मक्का तुरूंगातुन सुटका झालेल्या मोहल्ला निवसी युसुफ (30) याने तेथील आपबिती सांगितली. तो सांगत होता आमच्या समोर ठेवलेले अन्न हिसकावून घेतले जायचे आणि आम्हाला चाबकाने मारले जायचे अशी वाईट वेळ कुणावरच येवू नये. या कठिण परिस्थितीत आम्ही सर्वांनी 13 महिने कसे काढले आमचे आम्हाला माहिती अशी भावनाही यावेळी युसुफने बोलून दाखवली.
युसफ सांगत होता, आमच्या कंपनीत शॉर्ट सर्किट झाले त्यात एका मजुर मृत्यु झाला. कंपनीच्या आवारात झालेल्या मृत्यु ही गंभीर गोष्ट असल्यने कंपनीने मृत्यु झालेल्या मजुराचे कपडे बदलून त्याचा मृतदेह एका डोंगरामध्ये लपवला. या त्यांच्या प्रकारावर आमच्यापैकी काही जणांनी विरोध प्रदर्शन केले. हे शॉर्ट सर्किट ज्यांच्या चुकीने झाले ते मिस्र आणि फिलिपिन्स या देशांचे रहिवासी होते. पण ते त्यांच्या तेथील दुतावासाच्या मदतीने निर्दोष सुटण्यात यशस्वी झाले. पण आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्ही निर्दोष असताना आम्हाला तुरूगात 13 महिने काढावे लागल्याची खत त्याने व्यक्त केली.
हे प्रदर्शन करण्यासाठी माझ्या सोबत इतर सात देशांचे मजूर सहभागी झाले होते. या दरम्यान आमच्या समोर ठेवले अन्न हिसकावून घेण्यात यायचे आणि आम्हाला निर्दयीपणे चाबकाने मारले जायचे.
या 13 महिन्यांच्या कारावासात युसुफ सोबत आणखी 40 जण देखील होते. निर्दोष असताना देखील तुरूंगवास भोगणा-या या युवकांच्या नातेवाईकांनी दुतावासासमोर धरणे आंदोलही केले. परंतू काहीच उपयोग झाला नाही.
13 महिने तुरूंगवास भोगलेल्या युवकांची सुटका करण्यासाठी जेव्हा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेतला त्यावेळी या 40 भारतीय मजुरांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. यातील 12 मजुर सीकर,चूरू आणि नागौर या भागातील आहेत.
युसुफ आनंदाने साजरी करणार ईद - युसुफ़ची सुटका झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदात आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मिळून आनंदाने ईद साजरी करणार असल्याचे युसुफच्या वडीलांनी सांगितले.