आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-शर्ट आणि बंगाली लेहजामुळे अडकला मेहदी मसरुर, वाचा अटकेची कहानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: मेहदी मसरुर
बेंगळुरू - दहशतवादी संघटना ISIS चे ट्वीटर हँडल चालवण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला 24 वर्षीय मार्केटिंग एक्झीक्युटिव्ह मेहदी मसरुरच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशीत त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
ब्रिटनच्या चॅनल 4 ने ISIS चे ट्वीटर हँडल चालवणारा व्यक्ती भारतात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर गुप्तचर संस्थांनी त्याचा शोध सुरू केला आणि शनिवारी त्याला अटक केली. पण मेहदीला अटक करणे वाटते तेवढे सोपे नव्हते. त्याच्या टी शर्टच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. गुप्तचर संस्था मेहदी मसरुरपर्यंत कशा पोहोचल्या याची संपूर्ण कहानी याठिकाणी देत आहोत.
आयपी अॅड्रेसवर होती मदार
हे वृत्त येताच दिल्लीमधील गुप्तचर संस्थांच्या अधिका-यांना धक्का बसला. सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित मोदींच्या नीकटवर्तीयांनी अधिका-यांना थेट मेहदीला अटक करायला किती वेळ लागणार? असा प्रश्न केला. त्यानंतर लगेचच अमेरिकेतून मेहदीकडून ऑपरेट केल्या जाणा-या ट्वीटर अकाउंट @SamiWitness चे लॉग डिटेल्स मागवण्यात आले. त्यांना या अकाऊंटच्या आईपी (इंटरनेट प्रोटोकॉल) ची माहिती हवी होती. मसरुरपर्यंत पोहोचण्याचा हा थेट मार्ग होता. पण अमेरिकेतून एवढ्या लवकर ही माहिती मिळणार नाही याची कल्पना अधिका-यांना होती. त्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग निवडला.
आईपीऐवजी टी-शर्टचा शोध
सुरक्षा संस्थांनी आयपी अॅड्रेसऐवजी एका खास टी-शर्टचा शोध घेण्याचे ठरवले. चॅनल 4 च्या वृत्तामध्ये मेहदीचा फोटो दाखवण्यात आला होता. त्यात त्याचा चेहरा ब्लर (अस्पष्ट) केला होता. पण टी शर्ट स्पष्टपणे दिसत होता. त्याशिवाय चॅनलवर प्रसारीत करण्यात आलेल्या चर्चेमुळेही बरीच मदत झाली. एका व्हाइस अॅनालिस्टने पत्रकाराशी चर्चा करणारा व्यक्ती 20 ते 25 वयोगटातला असून त्याच्या भाषेचा लेहजा 'बंगाली' सारखा असल्याचे सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, टीशर्ट व इतर माहितीच्या आधारे मेहदीपर्यंत कसे पोहचले अधिकारी