आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 हजार पाकिस्तानींना ठार करुन भारतीय जिगरबाजांनी फडकवला होता कारगिलमध्ये तिरंगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1999 च्या कारगिल विजयाचा फोटो. - Divya Marathi
1999 च्या कारगिल विजयाचा फोटो.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या द्रास आणि कारगिल येथे भारत -पाकिस्तानमध्ये झालेले युद्ध हे जगात सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध होते. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ हे युद्ध सुरु होते. भारताच्या जिगरबाज जवानांनी पाकिस्तान लष्कर आणि घुसखोरांना सीमेपार जाण्यास भाग पाडले होते. कारगिल युद्धात 527 जवानांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहूती दिली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या खुलाशानूसार युद्धात पाकिस्तानचे एक हजार सैनिक आणि तीन हजार घुसखोर मारले गेले होते. भारतीय जवानांनी 26 जुलै 1999 रोजी कारगिलवर विजय मिळवून तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमीत्तानेच divyamarathi.com आपल्या वाचकांना या युद्धाशी संबंधित काही महत्त्वाच्या फॅक्ट सांगत आहे.
कसे सुरु झाले कारगिल युद्ध
मे 1999 चे ते दिवस होते. कारगिल भागातील एका गुराख्याने पाकिस्तानी घुसखोरांना शस्त्र आणि अन्नधान्य डोंगरावर घेऊन जातानी पाहिले होते. त्यानंतर बटालिक सेक्टरमध्ये लेप्टनंट सौरभ कालिया यांच्या पेट्रोलिंग युनिटवर हल्ला झाला आणि घुसखोरी झाल्याचे ठोस पुरावे मिळाले. सुरुवातीला भारतीय लष्कराने या घुसखोरांना पाकिस्तानी जिहादी समजले आणि एक छोटे युनिट त्यांना हुसकावून लावण्यासाठी पाठवले. मात्र घुसखोरांकडून कडाडून विरोध झाला. त्यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आणि मग अनेक भागात घुसखोरी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
घुसखोरांच्या रुपात आले पाक सैनिक
पाकिस्तानकडून पहिल्याच हल्ल्याला मिळालेले जोरदार प्रत्युत्तरानंतर भारतीय लष्कराच्या लक्षात आले, की घुसखोरांच्या रुपात पाकिस्तानने प्रशिक्षीत सैनिक मोठ्या योजनेसह भारतात पाठवले होते. मग भारताने 'ऑपरेशन विजय' सुरु केले. त्यात 30,000 भारतीय सैनिक सहभागी होते. पाक घुसखोरांनी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -1 वर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्या आसपासच्या डोंगरांवर कब्जा मिळवला होता. कारगिल श्रीनगरपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर आहे.
काय होता कारगिल युद्धाचा शेवट
भारताने 'ऑपरेशन विजया'ची जबाबदारी दोन लाख सैनिकांवर सोपवली होती. कारगिल आणि द्रासमधील तीस हजार पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी ही तयारी होती. त्यासाठी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ तोफा धडधडत होत्या. भारतीय सैनिकांनी अखेर पाक घुसखोरांना माघारी फिरण्यास भाग पाडून 26 जुलै 1999 रोजी अखेरच्या पाहाडावर ताबा मिळविला. या युद्धात अधिकृतरित्या पाकिस्तानचे 357 सैनिक मारले गेले. दुसरीकडे पाक नेत्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या म्हणण्यानूसार, भारतीय लष्कराच्या कारवाईत चार हजार पाकिस्तानी ठार झाले. भारतीय लष्कराचे 527 जवान शहीद झाले होते आणि 1363 जखमी झाले होते.
कशासाठी होती कारगिलमध्ये घुसखोरी
कारगिल युद्धाला पाकिस्तानचे तत्कालिन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ जबाबादार असल्याचे मानले जात होते. कारगिलमध्ये एलओसीच्या माध्यमातून घुसखोरीचे षडयंत्र हे त्यांचेच असल्याचे संरक्षण तज्ज्ञ सांगतात. 1947 आणि 1965 मध्येही पाकिस्तानने काश्मिरवर दावा सांगितला होता. कारगिलमधील घुसखोरी देखील त्याच षडयंत्रांचा भाग होती. काश्मिर मिळवण्यासाठी पाकिस्तानने कायम घुसखोरी आणि दहशतवादाचा आश्रय घेतला आहे. कारगिल युद्धावेळी भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी भारतीय वायूसेनेने 26 मे रोजी 'ऑपरेशन सफेद सागर' सुरु केले होते. त्यांनी कराचीहून समुद्रीमार्गांवर करडी नजर ठेवली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कारगिल युद्धात कोणत्या परिस्थिती लढत होते जवान