आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवर बघितले, फोनवर पडला प्रेमात, अॅसिड अटॅक झालेल्या मुलीशी केले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोकारो/तलचर - अॅसिडमुळे फक्त चेहराच नव्हे तर आयुष्य होरपळून जाते. बोकारोची सोनाली मुखर्जी अॅसिड हल्ल्यामुळे एका डोळ्याने पाहू शकत नाही. तिच्यावर ३४ शस्त्रक्रिया झाल्या. चित्तरंजन तिवारी या इंजिनिअरने तिच्याशी चार दिवसांपूर्वी लग्न करून एक आदर्श घालून दिला. या निर्णयाचे कारण? असे विचारले असता चितरंजन सांगतो, ‘अभिमान वाटावा, असे काहीतरी करायचे होते व म्हणूनच मी हा निर्णय घेतला’. या नवदांपत्याशी "भास्कर'ने साधलेला संवाद...
एकमेकांची भेट कशी झाली? बोलण्यासाठी आधी कोणी पुढाकार घेतला?
सोनाली : चित्तरंजनने मला क्राइम पेट्रोलमध्ये पाहिले व माझ्याविषयी माहिती मिळवली.
चित्तरंजन : सोनालीचा शोध घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. टीव्हीवर पाहिल्यानंतर इंटरनेटवरून तिचा पत्ता आणि भावाचा मोबाइल क्रमांक मिळाला. भावाच्या माध्यमातूनच सोनालीशी पहिल्यांदा बोलणे झाले. नंतर आम्ही सतत बोलायला लागलो. लग्नासाठी प्रपोज कोणी केले?

सोनाली : ते माझ्याशी विविध विषयांवर बोलायचे. दरम्यान, एके दिवशी त्यांनी प्रपोज केले. भावुक होऊन असे म्हटले असेल, असे वाटले म्हणून मी नकार दिला. माझ्या होकारासाठी दोन महिने लागले.

चित्तरंजन : प्रपोज करेपर्यंत मी सोनालीला बघितलेही नव्हते. मागणी घातली तेव्हा मी मजा घेतोय असे तिला वाटले. ती म्हणाली, अशा गोष्टींचा त्रास होतो. काहींनी अाधीही मागणी घातली होती. याचे मला दु:ख वाटले.
पुढील स्लाईडवर वाचा, चित्तरंजन म्हणाला, की कार्यालयात परत गेलो तर बॉसने पार्टी मागितली. काही मित्रांनी यास विरोध, काहींनी चेष्टाही केली. अनेक निकटवर्तीयांनी तर बोलणेही सोडले