आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1600 अनोळखी व्यक्तींच्या वाढदिवसाची तारीख शोधली, 15 वर्षांपासून सर्वात आधी घरी जाऊन देतात शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - सकाळी ६.०० ची वेळ, पुरेसे उजाडलही नव्हते. तेव्हा ४७ वर्षीय राजेंद्र प्रसाद नगेले यांच्या घरी दत्त म्हणून हजर झाले. या वेळी कोण आले असा विचार करत प्रसाद यांनी दार उघडले. समोर पाहतो तर हातात पुष्पहार, मिठाई, नारळ व भेटवस्तू घेऊन एक गृहस्थ दिसले. राजेंद्र यांना काही कळण्याआधी हसतमुख चेहऱ्याने समोरचा म्हणाला, ‘हॅपी बर्थ डे राजेंद्रजी.’ अनोळखी व्यक्तीने राजेंद्र यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. टिळा लावून तोंड गोड केले.

याआधीही असाच कोणीतरी कुटुंबीयाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता हे त्यांच्या लक्षात आले. हे व्यक्ती अन्य कोणी नव्हे तर मोहनसिंह कुशवाह आहेत. ते दररोज सायकलीवर जन्मदिवस, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडतात. गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम आहे. मोहन यांना ओळखणारे म्हणाले, जवळपास १६०० लोकांना दरवर्षी अशाच पद्धतीने ते चकित करतात. त्यांच्या यादीत गोवा, राजस्थानचेही नागरिक आहेत. आता त्यातील बहुतांश त्यांना ओळखतही आहेत. मोहनसिंह सरकारी शिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी हा मार्ग निवडला. चार मित्रांची मदत घेतली. मोहनसिंह पहिल्या भेटीत त्यांच्या परिचितांचे नाव-पत्ता, जन्म आणि लग्नाची तारीख विचारतात. यात १६०० जणांची माहिती त्यांनी मिळवली.

रोज सकाळी तीर्थयात्रेसाठी निघतो
या वयात तर लोक तीर्थयात्रेवर जातात,पुण्य कमावतात. तुम्ही १५ वर्षांपासून रोज सकाळी लोकांना भेटवस्तू का देता, असे विचारल्यावर मोहनसिंह म्हणाले, हेच कार्य माझी तीर्थयात्रा आहे. रोज कुणाच्या ना कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पाहिजे. चांगुलपणा थांबायला नको. मी जसा लोकांशी वागतो तसेच ते इतरांशी वागतात. असेच काम करावे असे नव्हे. मात्र, चांगल्या कामाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...