आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा रॅम्पवर ही म्हैस चालते तेव्हा पैशांचा पडतो पाऊस, किंमत आहे 22 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या म्हशीबरोबर मालक जसबीर . - Divya Marathi
आपल्या म्हशीबरोबर मालक जसबीर .
जींद (हरियाणा)- जींदमधील बीबीपूर गावाच्या एका शेतक-याची पाच वर्षांच्या मु-हा जातीच्या म्हशीचा रुबाबच न्यारा आहे. म्हशीने आतापर्यंत हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांचा प्रवास केला आहे. तसेच या प्रवासा दरम्यान आपले कर्तबगारी दाखवून तिने लाखो रुपयांचे बक्षीस जिंकले आहेत. तीन महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशच्या व्यापा-यांनी या म्हशीवर 22 लाखांची किंमत लावली होती.
मात्र तिचा मालक जसबीर विकायला तयार नव्हता. म्हशीची तीन महिन्यांची वगरही तिच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. मार्च 2015 मध्‍ये केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसारने एक सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. यात मु-हा म्हशीने पहिला क्रमांक पटवून 5 हजार 100 रुपयांचे पुरस्कारही जिंकले होते.
म्हशीची उंची 5 फुट 4 इंच आहे. तिने आतापर्यंत तीनदा व्याहली आहे. चार महिन्यांपूर्वी म्हशीने 23.520 किलोग्रॅम दूध देण्‍याचा विक्रम स्थापित केला होता. दूध देण्‍यामध्‍ये इतर मु-हा म्हशींमध्‍ये ती भले मागे असो. पण जेव्हा ती रॅम्पवर उतरते तेव्हा इतर म्हैशी फिक्या ठरतात. सौंदर्यामध्‍ये पशू तज्ज्ञ तिलाच बक्षीस देण्‍याचा विचार करतात.
आतापर्यंत 20 पुरस्कार पटकवले
पाच वर्षांची ही म्हैश मुझफरनगरमध्‍ये होणा-या मु-हा जातीच्या प्रदर्शनात पुन्हा एकदा रॅम्पवर उतरणार आहे. 2014 मध्‍ये पंजाबच्या मुक्तसरमध्‍ये मु-हा म्हैशींच्या प्रदर्शनात तिने पहिल्या स्थान पटकवून रोख एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवले होते. अशाच प्रकारच्या स्पर्धेत म्हशीने भाग घेऊन इतर पुरस्कार मिळवले होते. आतापर्यंत तिने एकूण 20 पुरस्कार जिंकले आहे.
23 लीटर 540 ग्रॅम दूधाचे विक्रम
जसबीर यांनी सांगितले, की म्हशीला ते असे खास खूराक देत नाहीत. सामान्य जनावरांप्रमाणे तिचा चारा आहे. मात्र जेव्हा ती दूध द्यायला लागते तेव्हा तिला डाळ खायला दिले जाते. दररोज ते तिला तीन किलोग्रॅम हरबरा, तीन किलोग्रॅम ओटचे पीठ, सोयाबीनचे पीठ खायला दिले जाते. मुलाप्रमाणे देखभाल केली जाते आणि दोन वेळेस आंघोळ घातली जाते. गादीवर बसते.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर छायाचित्रे...