आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांच्या मुलीवर शेजारी करत होता रेप, प्रेग्नेंट राहिल्यानंतर समोर आले सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड) - येथील एका 13 वर्षांच्या मुलीला शिकवणीसाठी घरी बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. शेजाऱ्याच्या सततच्या अत्याचारातून अल्पवयीन विद्यार्थीनीला गर्भ राहिला. मुलीच्या आईचे निधन झालेले असून, तिने वडिलांना पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर ते उपचारांशिवाय तिला पोटदुखी थांबण्याचे औषध देत राहिले. मात्र सहा महिन्यानंतर एक दिवस मुलगी चक्कर येऊन पडली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि सर्व प्रकार समोर आला. 
 
 बाळाला जन्म द्यावाच लागणार... 
 - मुलीच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, तिला आता हॉस्पिटलमध्ये राहाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की मेडिकली  आता अबॉर्शन शक्य नाही. यामुळे मुलीच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिला बाळाला जन्म द्यावाच लागणार आहे. 
 - हे प्रकरण एक महिन्यांपूर्वी पोलिसात नोंदविले गेले होते. आरोपी महासमुंद जिल्ह्यातील एका लेडी कॉन्स्टेबलचा भाऊ आहे. अशी माहिती आहे, की यामुळेच या प्रकरणात गुन्हा नोंद होण्यात टाळाटाळ केली गेली होती. 
 - मात्र, जेव्हा हे प्रकरण नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सकडे पोहोचले तेव्हा आरोपी राकेश साहूला बुधवारी (19  ऑक्टोब) अटक करण्यात आली. 
 
 बापा आहे, त्यामुळे नाही कळाले मुलगी गर्भवती आहे
 - मुलीचे वडील अपंग आहेत. त्यांना चालता-फिरता येत नाही. मुलगी गर्भवती राहिली तरी कसे कळाले नाही, यावर शरमेने मान खाली घालत ते सांगतात की तिची आई ह्यात नाही आणि मी बाप असल्याने मुलीचे दुःख समजू शकलो नाही. कदाचित तिची आई असती तर, आज हे दिवस पाहावे लागले नसते. 
 - मुलाला जेव्हा त्रास होत होता, ती वेदनेने रडत होती, तेव्हा वाटाचये की तिने काही चुकीचे खालले असेल, म्हणून पोट दुखत आहे. सत्य समोर आल्यानंतर मी एफआयआर दाखल केला आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मुलगी विचारते, \'मला काय झाले आहे, कोणी काही सांगत का नाही...\'
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...