आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सिद्धूच्या MLA सौभाग्यवती, आपल्याच विभागाचे स्टिंग करुन आल्या होत्या चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीसोबत डॉ. नवजोत कौर सिद्धू - Divya Marathi
मुलीसोबत डॉ. नवजोत कौर सिद्धू
अमृतसर - मैदान खेळाचे असेल नाही तर राजकारणाचे हसमुख नवज्योतिसिंग सिद्धू हा हरफनमौला आपल्या उपस्थितीने वातावरण बदलून टाकतो. 20 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस आहे. या निमीत्ताने जाणून घेऊ या फारशी चर्चेत नसलेल्या त्याच्या पत्नीविषयी. सिद्धूची पत्नी नवजोत कौर पंजाबच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची मुख्य संसदीय सचिव राहिलेली आहे. डॉ. नवजोज कौर सिद्धूने त्यांच्याच विभागातील मेडिकल ऑफिसरचे स्टिंग केले होते. यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

नवजोत कौर व्यवसायाने डॉक्टर आहेत. राजकारणात येण्याआधी त्यांनी जानेवारी 2012 मध्ये आरोग्यविभागाचा राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपच्या वतीने अमृतसर पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. विजयी झाल्यानंतर त्या भाजप संसदीय मंडळाच्या सचिव झाल्या होत्या.
डॉ. नवजोत कौर यांचा जन्म 15 जून 1963 रोजी लुधियानात झाला. त्यांनी शालेय शिक्षण लुधियानातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेतून पूर्ण केले. 1981-85 दरम्यान त्यांनी पटियाला येथून एमबीबीएस केले. 1990-92 पर्यंत त्यांनी पटियालाच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये एमडी केले.
असे केले स्टिंग
आपल्याच विभागाचे स्टिंग केल्याने डॉ. नवजोत कौर प्रसिद्ध झाल्या होत्या. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे त्यांनी स्टिंग केले होते. शासकीय सेवेत असताना हा डॉक्टर स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालवत होता. या स्टिंगसाठी डॉ. सिद्धू स्वतः पेशंट बनून गेल्या होत्या. त्यांनी चेहऱ्यावर ओढणी ओढून घेतली होती. जेव्हा डॉक्टर त्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना तपासण्यासाठी आला तेव्हा डॉ. सिद्धूंनी त्याला रंगेहात पकडले.
स्त्री-भ्रूण हत्येविरोधात चालवली मोहिम
डॉ. सिद्धूंनी 1988 मध्ये पंजाबमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी म्हणून नोकरी सुरु केली. या कार्यालयात असताना त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जोरदार मोहिम सुरु केली होती. या काळात त्यांनी रात्रीतून दवाखाण्यांवर छापा मारुन स्त्री-भ्रूण हत्या करणाऱ्यांना पकडले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...