आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story On Rock Garden Chandigarh Creator Nekchand

चंदिगडच्या रॉकस्टार गार्डनचे शिल्पकार नेकचंद यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - दगडांमध्ये प्राण ओतून त्यातून हुबेहूब शिल्पे साकारणारे मूर्तीकार पद्मश्री नेकचंद (९०) यांचे गुरुवारी मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. चंदिगड शहरातील प्रसिद्ध रॉकस्टार गार्डन ही नेकचंद यांच्या शिल्पकलाकृतीचा उत्कृष्ट नमुना ठरली. नेकचंद गेल्या अनेक दिवसांपासून मधूमेह, उच्चरक्तदाब तसेच कॅन्सरने पीडित होते. छातीत दुखत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना चंदिगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. नेकचंद यांचा जन्म १५ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानात शकरगड येथे झाला होता. १९४७ मध्ये ते भारतात आले. १९५१ मध्ये ते बांधकाम खात्यात नोकरीस लागले. बेकार वस्तू जमा करून त्यातून वेगवेगळ्या कलाकृती निर्मिी करण्याचा त्यांना छंद होता. १९८४ मध्ये सरकारने त्यांना पद््मश्री देऊन गौरवले होते. त्यांच्या विविध शिल्पकृतींना वॉशिंग्टनमधील स्कल्पचर गार्डन कॅपिटल चिल्ड्रन,न्यूयॉर्कमधील अमेरिकन फोक आर्ट म्युझियम तसेच स्वित्झर्लंडमधील आर्ट कलेक्शन सेंटरमध्ये स्थान मिळाले होते.