आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात जन्मला 2 प्रायव्हेट पार्ट असलेला मुलगा, डॉक्टरांनी घेतला हा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंडवाडा (राजस्थान) - एका आठवड्यापूर्वी येथील मातृछाया रुग्णालयात जन्मलेल्या एका विचित्र अर्भकाचे जे.के. लोन हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. यानंतर हा मुलगा बरा झाला आहे. तथापि, त्याला डॉक्टरांच्या देखरेखीतच ठेवण्यात आले आहे. जन्माच्या वेळी या मुलाला चार पाय, तीन हात आणि दोन जननेंद्रिये होती. यानंतरही हा मुलगा एकदम स्वस्थ होता.
 
अशी खूप कमी प्रकरणे समोर येतात...
- अशा विचित्र शरीरामुळे मुलाला उदयपूरच्या महाराणा भूपाल रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून जे.के. लोन हॉस्पिटलमध्ये पाठवले. येथे मात्र मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 
- ऑपरेशन करून या मुलाचे सर्व अतिरिक्त अवयव काढण्यात आले आहेत. यानंतर या मुलाची प्रकृती एकदम ठीक झाली आहे.
- विशेषज्ञांनुसार, खूप कमी प्रमाणात अशा मेडिकल केसेस उद्भवतात. खूप कमी केसेसमध्ये अशा विकृतीसह जन्मलेले मुले इतके स्वस्थ असतात.
 
आठवड्याभरापूर्वीच झालाय जन्म
- या मुलाचा जन्म 29 जुलैला पिंडवाडाच्या मातृछाया रुग्णालयात झाला.
- रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, नवजात मुलाला चार पाय, तीन हात आणि दोन जननेंद्रिये होती. व इतर सर्व अवयव सामान्य होते. खूप कमी केसेसमध्ये अशा विकृतीसह जन्मलेली मुले जिवंत राहतात. यामुळे मुलावर उपचार करण्यासाठी त्याला स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी यशस्वीरीत्या मुलाचे अतिरक्त अवयव काढले. व मुलगाही यानंतर स्वस्थ आहे. 
- त्यांनी सांगितले की, जयपूरचे एसएमएस मेडिकल कॉलेजचे डॉक्टर प्रवीण माथूर यांनी मुलाचे ऑपरेशन केले.  रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, प्रसूतीपासून ते मुलाच्या ऑपरेशनपर्यंत सर्व सरकारी योजनेअंतर्गत पूर्णपणे नि:शुल्क करण्यात आले. रुग्णालयानेच कुटुंबीयांना या ऑपरेशनसाठी समजूत घालून त्यांना जयपूरला पाठवले होते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, मुलाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...