आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरी खाताच झाला तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणीपुरी खाताना तरुणाचा मृत्यू झाला. - Divya Marathi
पाणीपुरी खाताना तरुणाचा मृत्यू झाला.

कानपूर - जिल्ह्याच्या सजेती परिसरात बुधवारी एका तरुणाचा पाणीपुरी खाताना मृत्यू झाला. खाताना पुरी त्याच्या घशात अडकली होती, यामुळे खोकत-खोकतच तो बेशुद्ध झाला. सोबत असलेल्या नातेवाइकांना त्याला त्वरित रुग्णालयात नेले, येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तरुणाचा मृत्यू पाणीपुरीचा गोलगप्पा 

श्वासनलिकेत अडकल्याने वा हार्ट अटॅकने झाला आहे. तथापि, पोस्टमॉर्टमनंतर खरे कारण समोर येईल.

 

घशात अडकला होता गोलगप्पा...
- सजेती परिसरातील हरबसपूर येथील रहिवासी नरेश सचना शेतकरी होता. सोबतच फावल्या वेळेत तो ट्रकही चालवत होता. कुटुंबात पत्नी सीमा, 2 मुले आणि एक मुलगी आहे.
- बुधवारी दुपारी तो काही कामानिमित्त घराबाहेर निघाला होता. गावातीलच दीपेश म्हणाला, नरेश चौकात थांबून पाणीपुरी खात होता. दरम्यान, खाताना अचानक एक गोलगप्पा त्याच्या घशात अडकला. यानंतर तो जोरजोराने खोकू लागला. खोकल्याच्या उबळीमागे उबळ येऊन तो बेशुद्ध झाला आणि जोरात खाली पडला.

- बेशुद्ध झाल्यावर त्याच्यावर पाणी शिंपडले, त्याला थोडी शुद्ध आली पण श्वास घेता येत नव्हता. यानंतर जवळच्या रुग्णालयात नेले पण तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

काय म्हणाले डॉक्टर?
- घाटमपूर रुग्णालयाचे डॉक्टर अजित सचान म्हणाले, कुटुंबातील लोकांच्या सांगण्यानुसार तो पाणीपुरी खाताना बेशुद्ध झाला. घशात गोलगप्पा अडकल्याने त्याची श्वासनलिका चोक झाली असेल किंवा हार्ट अटॅकनेही मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...