आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी: प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली माचिस- कापड, FB वरुन आरोपींची ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदायू (उत्तर प्रदेश) - येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन प्रायव्हेट पार्टमध्ये काडी, माचिससह पाच वस्तू टाकण्यात आल्या. 23 जून रोजी घडलेल्या या अमानुष अत्याचाराने मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मुलीच्या बहिणीने फेसबुकच्या माध्यमातून आरोपींना ओळखले आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर, तिसरा फरार आहे. तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, '23 जून रोजी घटना घडली. पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली होती. तिला रस्त्यात अडवून आरोपींनी बाईकवरुन पळवून नेले. तिच्या तोंडात बोळा कोंबल्यामुळे तिला ओरडता आले नाही.' मुलीचा आरोप आहे, की त्यातील एक आरोपी तिचा शेजारी होता, इतर दोघे त्याचे मित्र होते. तिन्ही आरोपींनी तिला जवळ असलेल्या ऊसाच्या शेतात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. एका शेतकऱ्याने गंभीर अवस्थेत तिला पाहिल्यानंतर तिला तिच्या घरी पोहोचवले.
मुलीला मोठा मानसिक धक्का, बहिणीने केली मदत
पोलिसांनी सांगितले, की बलात्काराच्या घटनेनंतर मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. तिने घरातील सर्वांशी बोलणे बंद केले. कुटुंबियांनी तिची परिस्थिती पाहून लखनौला असलेल्या तिच्या बहिणीला बोलावून घेतले. बहिणीने तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काय घडले हे जाणून घेतले. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून सर्व आरोपींची ओळख पटवली. रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अजून फरार आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले सत्य
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानतंर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला. वैद्यकीय तपासणीत तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कापड, पॉलिथिन, बॉटलचे झाकण, काडी आणि माचिस असल्याचे आढळले. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आता आरोपी आणि मुलीची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, निर्भया सामूहिक बलात्कारानंतर सरकारने काय केले