आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित आत्महत्या : उद्या देशव्यापी संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झाले. विद्यार्थ्यांनी विपिन श्रीवास्तव यांच्या हंगामी कुलगुरुपदी नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळला असून २७ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने (जॅक) मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी देशव्यापी शैक्षणिक संपाची हाक दिली आहे. विद्यार्थी, एससी/ एसटी प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांनी श्रीवास्तव यांची हंगामी कुलगुरुपदी नियुक्तीस विरोध केला आहे.