आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय विद्यालयाच्या स्टूडेंट्सची दबंगगिरी; मित्राला बेदम मारहाण करून बनवला व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर- बिहारमधील मुझफ्फरपूर येथील केंद्रीय विद्यालयाच्या 12वीच्या विद्यार्थ्यांंची दबंगगिरी चव्हाट्यावर आली आहे. विद्यालयातील क्लासरुममध्ये काही दबंग विद्यार्थ्यांंनी त्यांंच्या एकाा मित्राला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळेे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

11 वी आणि 12 वीच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका मित्राला क्लासरुमध्ये घेरले. त्याला बेदम मारहाण केली. जोड्याने त्याचे तोंडही फोडले. एवढेेच नाही तर, या मारहाणीचा व्हिडिओ बनवूून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. याप्रकरणी प्राचार्य राजीव रंजन यांनी गंभीर दखल घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

उत्तम कुमार असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून मारहाणीच्या भीतीमुळे तो त्या दिवसापासून शाळेत येत नसल्याचे सूत्रांनी‍ सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आई वडीलांनी देखील त्यांचा मोबाइल बंद ठेवला आहे.

जाणून घ्या काय आहे व्हिडीओमध्ये....
- बिहारमधील धक्कादायक व्हिडिओ दिल्लीपर्यंत व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. डीएम-एसएसपीने केंद्रीय विद्यालयात घडलेल्या कथित घटनेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्राचार्यांना आरोपी‍ विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहे.
- काजी मोहम्मदपूर ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीहून एक केंद्रीय पथक विद्यालयात चौकशी करण्यासाठी येणार असल्याची माहीत मिळाली आहे.

दोषी विद्यार्थ्यांना केले निलंबित...
- उत्तम कुमारला बेदम मारहाण केल्याप्रकरणी 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
- मारहाण करणार्‍यांमध्ये काही 11 वी, 12 वीचे विद्यार्थी होते. त्यांंचाही शोध घेतला जात आहे.
- 7 सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, विद्यार्थ्याच्या मारहाणीचे फोटोज आणि व्हायरल झालेला व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...