आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथीतील मुलाच्या बॅगमध्ये आढळले असे काही, पकडल्यावर शिक्षकाने केले असे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीरपूर (यूपी) - एक विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये प्रेमपत्र आढळल्यावर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. मुलाची पाठ आणि गालावर काठी मारल्याचे निशाण पडले. पालकांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षकाने म्हटले की, मुलगा एका मुलीला लव्ह लेटर लिहून परेशान करत होता.
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना राठ वस्तीतील सरस्वती शिक्षण मंदिर शाळेतील आहे. येथे राहुल (वय 8 - बदललेले नाव) हा इयत्ता चौथीत शिकतो. तो गुरुवारी शाळेत गेला होता. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगमध्ये एक प्रेमपत्र आढळले. यानंतर शिक्षकाने भरवर्गात त्याला काठीने बेदम मारले. त्याच्या पाठीवर आणि गालावर मारहाणीचे वळ उमटले.
- मारहाणीनंतर शिक्षकाने त्याला कित्येक तास घरी जाऊ दिले नाही. घरी पोहोचून त्याने पालकांना पूर्ण घटना सांगितली. मुलाच्या वडिलांनी शाळेच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार देऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
- दुसरीकडे, आरोपी टीचर अभिषेक म्हणाला की, तो वर्गातील एका मुलीला प्रेमपत्र देऊन दररोज परेशान करत होता. गुरुवारी तो त्याच्या बॅगमधून  ते पत्र आढळले. मी त्याला समजावण्यासाठी थोडेसेच मारले, जेणेकरून पुढे चालून त्याने हे सर्व बंद करावे.
- राठ येथील पोलिस स्टेशन इंचार्ज एस. के. सिंह म्हणाले, मुलाच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...