आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Dies Beaten By School Principal In Barabanki News In Marathi

पेन्सिल चोरली म्हणून मुख्याध्यापकांनी तिसरीतील विद्यार्थ्याला जमिनीवर आपटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: चौकशी करताना पोलिस अधिकारी. इन्सेटमध्ये मृत शिवा)

बाराबंकी- पेन्सिल चोरल्याच्या शुल्लक कारणावरून एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. अनेकदा जमिनीवरही आपटले आणि दुसर्‍या दिवशी त्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील रहलामऊ येथील प्रसाद मेमोरियल अकादमीत ही घटना घडली. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहलामऊ येथील प्रसाद मेमोरियल अकादमीच्या शाळेत शिकणार्‍या शिवाचा बुधवारी (8 एप्रिल) मृत्यु झाला. शिवाच्या मृत्युला शाळेचे मुख्याध्यापक ललित वर्मा जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. आरोपी मुख्याध्यापकांनी शिवा बेदम मारले होते. त्याला अनेकदा जमिनीवर आपटले होते.
शिवा मंगळवारी (7 एप्रिल) शाळेतून घरी आला तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त येत होते. मुख्याध्यापकांनी मारल्याचे त्याने आईला सांगितले. शिवाने कोणाची खोडी काढली म्हणून शिक्षकांनी त्याला शिक्षा केली असेल, असे समजून पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. शिवावर प्रथमोपचार करण्यात आले. परंतु, दुसर्‍या दिवशी बुधवारी शिवाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु रस्त्यातची शिवाची प्राणज्योत मालवली.
शिवाच्या आई-वडीलांनी त्याचा मित्र सुधीरला विचारल्यानंतर त्याने शाळेतील सगळा प्रकार सांगितला. एका विद्यार्थ्याची पेन्सिल चोरी झाल्याप्रकरणी मुख्याध्यापक ललित शर्मांनी सर्व विद्यार्थ्यांची झडती घेतली. यात शिवाकडे पेन्सिल आढळून आली. त्यावरून शर्मा यांनी शिवाला बेदम मारले. एवढेच नव्हे तर मुख्याध्यापक शर्मा यांनी शिवाला अनेकदा जमिनीवर आपटल्याचेही सुधीरने सांगितले.
बाराबंकीचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.ओ.पी. सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी मुख्याध्यापकाला अटक केले आहे. शिवाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्‍ट होईल, पोलिसांनी सांगितले.