आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा, चेंबरमध्ये घुसून प्रिंसिपलची केली निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/गुमला- कार्तिक उरांव कॉलेजचे प्रिंसिपल शशिभुषण सिन्हा यांची त्यांच्या एका विद्यार्थ्याने कॉलेजच्या चेंबरमध्ये घुसून निर्घृण हत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी विद्यार्थी राजेश कुजूर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्हा कबुल केला असला तरी हत्येमागचे कारण सांगितले नाही.
पोलिस आयुक्त म्हणाले
आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. विद्यार्थी मानसिक रुग्ण असल्याचे दिसून येते. हत्या का केली याची माहिती मात्र त्याने अद्याप दिलेली नाही. सिन्हा कॉलेजचे प्रभारी प्रिंसिपल होते. शिस्तीचे प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाचा दर्जा वाढावा यासाठी ते कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यामुळे काही विद्यार्थी त्यांच्यावर जाम चिडले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उग्र विद्यार्थ्यांनी पुकारला बंद
हत्येची माहिती मिळाल्यावर अनेक विद्यार्थी आणि सिन्हा यांचे नातलग कॉलेजच्या आवारात जमा झाले. त्यानंतर सिन्हा यांना नेण्यात आले त्या रुग्णालयाच्या आवारात ते गेले. त्यांनी तेथे रास्तारोको केला. अनेक वाहने रोखून धरली.
पुढील स्लाईडवर बघा, या विद्यार्थ्यावर आहे हत्येचा आरोप... असे रक्ताच्या थारोळ्यात सिन्हा यांना नेले रुग्णालयात...