आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Murdered In Bihar People Set Fire In Village

तरुणाच्या हत्येनंतर 40 घरे पेटवली, तिघांना जिवंत जाळले, पोत्यात सापडला मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर/पाटणा- बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये प्रेमसंबंधातून 40 घरे जाळण्यात आली असून तिघांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अन्य दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्यात सरैय्या भागातील अजितपूर बहिलवारा गावात ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, अज‍ितपूर बहिलवारामध्ये एका विद्यार्थ्याचे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, याची माहिती तरुणीच्या नातेवाइकांना मिळाली होती. गेल्या आठवड्यात प्रियकर विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर अजीतपूर बहिलवारा गावात जाळपोळ सुरु झाली. हल्लेखोरांनी परिसरातल्या तब्बल 40 घरांना आग लावली. अनेक वाहने जाळण्यात आली. यातच अनेक जण होरपळल्याची माहिती मिळते आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिसांनी 14 जणांना अटक केली असून पाच हजारांहून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रियकर विद्यार्थी एक आठवड्यापासून बेपत्ता होता. रविवारी (18 जानेवारी) दुपारी गावापासून जवळच असलेल्या शेतात एका पोत्याचा विद्यार्थ्याला मृतदेह आढळला होता. त्यानंतर परिसरात हिंसा भडकल्याचे डीएम अनुपम कुमार यांनी सांगितले.

चार जिल्ह्यातील पोलिस घटनास्थळी...
सद्यस्थितीत सीतामढी, मुजफ्फरपूर, छपरा व वैशाली जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय लष्कराचे 400 जवानांना पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, मुख्यमंत्री मांझी मुंबई दौरासोडून परतले....