आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत धुंद विद्यार्थ्यांच्या पोर्शने 12 ऑटो रिक्शांना धडक, एक ठार- तीन जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - दारुच्या नशेत असलेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या पोर्श कारने रस्त्याच्या कडेल्या असलेल्या 12 ऑटो रिक्शांना टक्कर मारली. सोमवारी पहाटे (3.30) झालेल्या या अपघातात एक जण ठार झाला तर तीन ऑटो रिक्शा चालक जखमी आहेत. पोर्शच्या धडकेमुळे ऑटो रिक्शा चकनाचूर झाल्या.
कसा झाला अपघात
- मिळालेल्या माहितीनुसार, टी नगर येथील विकास विजय आनंद (22) आणि त्याचा मित्र चरणकुमार रात्री झालेल्या पार्टीवरुन परत येत होते.
- सु्प्रीम कोर्टतील वकीलांचा मुलगा असलेला विजय आणि त्याचा मित्र चरण दोघेही नशेत होते.
- पोलिस म्हणाले, घटनेवेळी कारमधील दोघेजण दारुच्या नशेत होते. कार डिव्हायडरला धडकल्यानंतर सरळ ऑटो रिक्शांवर जाऊन आदळली.
पोलिस काय म्हणाले
- एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, विजय ड्रायव्हिंग करताना नशेत होता, पुढील तपास सुरु आहे.
- घटनेच्यावेळी या लक्झरी कारची एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील दोन्ही तरुणांना काही झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...