आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11वीच्या विद्यार्थ्याने मित्रावर केला गोळीबार, मुलीवरुन झाले होते भांडण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (रांची) - येथील दयानंद पब्लिक स्कूलमधील 11वीच्या एका विद्यार्थ्याने बुधवारी सकाळी त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा शाळेत असेंब्ली सुरु होती. फायरिंगच्या आवाजाने सर्व गोंधळले. विद्यार्थ्यांनी पळापळ सुरु केली. दुसरीकडे, गोळी लागलेला विद्यार्थी जमीनीवर पडला होता. त्याला टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुलीवरुन झाले होते भांडण
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.
- आरोपीने सांगितले, की त्यांच्याच वर्गातील एका मुलीवरुन दोघांमध्ये याआधी भांडण झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी गोळ्या झाडल्या.
- गोळी विद्यार्थ्याच्या स्पायनल कॉडमध्ये अडकली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या शरीरातून गोळी काढण्याचा प्रयत्न होत आहे.

आरोपीची पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरु - पोलिस आयुक्त
- जमशेदपूरचे पोलिस आयुक्त अनुप मॅथ्यू यांनी सांगितले, ' 11वीचा विद्यार्थी सुधांशूवर गोळी झाडण्यात आली. त्याच्यावर गोळ्या झाडणारा त्याच्याच वर्गातील त्याचा मित्र अमित आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीकडे शस्त्र कसे आले याचा शोध घेतला जात आहे.'

शाळा प्रशासनाचे तोंडावर बोट
- या प्रकरणी दयानंद पब्लिक स्कूल प्रशासनाकडे विचारणा केली असता कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यांनी या प्रकरणी तोंडावर बोट ठेवले आहे.
- दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले आहे. विद्यार्थी शाळेत रिव्हॉल्वर घेऊन कसे येतात असा सवाल पालकांनी केला आहे. त्यांच्या बॅगमध्ये काय-काय असते हे शाळा का, तपासत नाही, असा प्रश्न पालिकांनी उपस्थित केला.

(Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...