आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाजावर चिकटवली सुसाइड नोट, फोटोखाली लिहली होती मृत्‍यूची तारीख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - ‘प्‍लिज माझ्या बाबांना फोन करू नका, ते म्‍हातारे आहेत. त्‍यांना हार्ट अटॅक येईल'
ही सुसाइड नोट आहे स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणा-या एका विद्यार्थ्याची. त्‍याने बुधवारी आत्‍महत्‍या केली व ही सुसाइड नोट त्‍याच्‍या रूमच्‍या दरवाजावर चिकटवली. या युवकाने आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍याच्‍या नातेवाईकांना फोन करून बोलावले होते. नातेवाईक पोहोचेपर्यंत या विद्यार्थ्‍याने आत्‍महत्‍या करून सुसाइड नोट दरवाजावर चिटकवली होती.

पोलिसांनी या विद्यार्थ्‍याचा मृतदेह ताब्‍यात घेतला. या युवकाने आत्‍महत्‍या का केली याचे कारण
पुढे आले नाही. प्रतापनगर पोलिस स्‍टेशनचे एएसआय मूलसिंह यांनी सांगितले की, बालोतरामध्‍ये जागसू येथील प्रभुराम जोधाराम पटेल हा 25 वर्षीय विद्यार्थी राहत होता. एका स्‍पर्धा परीक्षेचा क्‍लासही त्‍याने येथे लावला होता. बुधवारी त्‍याने सुसाइड नोट लिहीली. त्‍यानंतर पंख्‍याला लटकून जीवनयात्रा संपवली.
आत्‍महत्‍येपूर्वी तो 15 मिनीट फोनवर बोलला
- आत्‍महत्‍येपूर्वी 15 मिनीट फोनवरून केली नातेवाईकांशी चर्चा.
- बाबूलाल नावाच्‍या नातेवाईकाला फोन करून बोलावले होते.
- काही वेळानंतर रूमवर पोहोचलेल्‍या बाबूलालला सुसाइड नोट दिसली.
- बाबूलालने युवकाचा काका आणि पोलिसांना दिली माहिती.
मित्रांची उधारी चुकवून केली आत्‍महत्‍या
या युवकाने सुसाइड नोटमध्‍ये फोटोच्‍या खाली जन्‍म दिनांक आणि मृत्‍यू दिनांक लिहीली. वडिलांसाठी त्‍याने लिहीले की, 'बाबा मला माफ करा.' आई, ताई आणि भावाचा उल्‍लेखही त्‍याने या नोटमध्‍ये केला आहे. या युवकाने मित्रांकडून घेतलेली 3500 रूपयांची उधारी चुकवल्‍याचाही उल्‍लेख केला. परीक्षेत मिळालेल्‍या अपयशामुळे त्‍याने टोकाची भूमिका घेतली असे बोलले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, पूर्ण सुसाइड नोट..