आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Uniform Red For Railway Line Crossing In Ranchi

दररोज 500 विद्यार्थी रूळ ओलांडतात, रेल्वेच्या भीतीने चक्क गणवेशच केला लाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- रांची आऊटरची मुख्य रेल्वेलाइन. दररोज 45 ट्रेन्सची ये-जा आणि रेल्वे रुळापासून फक्त 20 फुटांच्या अंतरावर तीन शाळा. रुळाजवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गणवेशच लाल ठेवण्यात आला आहे. ही परिस्थिती आहे अनगडा गटातील सीताडीह माध्यमिक शाळा, डुमरगडी माध्यमिक शाळा आणि बरवादाग विद्यालयाची. शाळा धोकादायक ठिकाणी असल्यामुळे दररोज 500 मुले जीव धोक्यात घालून ही पटरी पार करतात व शाळेत पोहोचतात. पण लाल गणवेशाचा परिणाम असा की, आतापर्यंत कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याबाबत काहीही दुर्घटना घडलेली नाही. ट्रेनचे चालक लाल गणवेश घातलेली मुले पाहून दूरवरूनच ब्रेक लावतात. गरज पडल्यास चालक ट्रेन थांबवतातसुद्धा.
या शाळांचे अध्यक्ष तनुराम लोहरा सांगतात की, रेल्वे रूळ ओलांडणे हा नाइलाज आहे. हे लक्षात घेऊनच आमच्या पूर्वजांनी शाळेचा गणवेश लाल रंगाचा असेल, असे ठरवले. हा उपाय खूप प्रभावी ठरला. तसे तर आमचे शिक्षक स्वत: तेथे उभे राहून मुलांना रूळ ओलांडण्यासाठी मदत करतात. यापैकी सीताडीह व डुमरगडी शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ पार करणे अपरिहार्यच आहे. शिक्षकांनाही त्यांची वाहने रुळाच्या दुसºया बाजूला ठेवूनच यावे लागते, अन्यथा दररोज रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालावा लागतो.