आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Daily Cross Lake And Mountains For Study

लाटांशी झुंजत शिकण्याची जिद्द: सरोवर, टेकड्या पार करत शाळा गाठणारी मुले, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- महाराष्ट्रातील ग्रामीण भागाप्रमाणेच राजस्थानमध्येही शाळेपर्यंतची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. येथील मिंदोरा मगरा गावातील मुलांची जिद्द खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
थंडी, वारा असो वा पाऊस ही मुले जयसमंद सरोवर पार करत शाळेत पोहोचतात. शाळेत जाण्यासाठी मुलांना दोन तास आधीच निघावे लागतात, कारण रस्त्यात पुढे टेकड्यांचेही आव्हान असते. बहुतांश मुले भिजण्याच्या भीतीने पुस्तके शाळेतच ठेवतात. पाण्यातून बाहेर पडल्यावर कपडे वाळवून पुढची वाट चालावी लागते.

शिक्षिका होऊन शाळा उघडणार-

या विद्यार्थ्यांपैकी आठवीची विद्यार्थिनी धर्मी मिणा म्हणते, ‘मी मोठी झाल्यावर शिक्षिका बनून गावात शाळा उघडणार आहे. आमच्या गावातील पाच वर्षांचा राजेश बुडता-बुडता वाचला होता, त्यामुळे मुलांनी कोणतीही जोखीम पत्करु नये, असे मला वाटते.
पुढील स्‍लाईडवर पाहा या मुलांची शिकण्याची जिद्द...