आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Get Benefit Of 60 Percent In Railway Ticket

रेल्वे एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थ्यांना 60 टक्के सूट; राजधानीसह दूरंतो आणि शताब्दीमध्ये Wi-Fi

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- रेल्वे प्रवाशांना खुशखबर आहे. 'आयआरसीटीसी'च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये (स्पेशल ट्रेन) विद्यार्थ्यांसाठी तिकिट दरात 60 टक्के सूट मिळणार आहे. ही सुविधा फक्त स्लीपर कोचमध्ये दिली जाणार आहे. ही योजना एक वर्षासाठी प्रायोगित तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे.

याशिवाय नवीन वर्षात राजधानीससह शताब्दी और दूरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना वाय फाय (Wi - Fi) सुविधा मिळणार आहे. प्रवास करताना प्रवाशांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

विद्यार्थ्यांना अावश्यक असेल बोनाफाईड सर्टिफिकेट
रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी 60 टक्के सूट ही फक्त आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या टूर पॅकेजसाठी असेल. विशेष म्हणजे ही सूट मूळ भाड्यावर (बेसक फेअर) मिळेल. तसेच विद्यार्थ्याला शाळा अथवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट आवश्यक असेल. विद्यार्थ्याला हे सर्टिफिकेट संबंधित स्टेशनवर सादर करावे लागेल.

पुढीलस्लाइड्सवर वाचा, आणखी एका सुविधेविषयी...