आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतील भुकेल्या विद्यार्थ्यांनी मागितली मदत, रेल्वेमंत्र्यांनी चक्क पाठवले भोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- रेल्वेमधून प्रवास करणार्‍या काही विद्यार्थ्यांनी चक्क रेल्वेमंत्र्यांनाच 'ट्वीट' करून भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी प्रवाशी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत रेल्वे बोर्डाला विद्यार्थ्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्‍याचे आदेश दिले. वाराणसी कॅंट स्टेशनवर विद्यार्थ्यांना पुरीभाजी, डाळभात पाणी व कॉफीची व्यवस्था करण्‍यात आली. डेहराडून येथील एसीएन स्कूलचे ते विद्यार्थी असून सोमवारी रात्री रेल्वेने प्रवास करत होते.

काय आहे प्रकरण?
हरिद्वार ते हावडा जाणारी कुंभ एक्स्प्रेस धुक्यामुळे तब्बल नऊ तास उशीराने धावत होती. या एक्स्प्रेनचे डेहराडून येथील एसीएन स्कूलचे काही विद्यार्थी प्रवास करत होते. ते भूकेने व्याकूळ झाले होते. एक्स्प्रेसला पेंट्रीकारही नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना ट्विट करून मदत मागितली. प्रभु यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे बोर्डाला विद्यार्थ्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्‍याचे आदेश दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करणार्‍या एका महिलेने अशाप्रकारे रेल्वेमंत्र्यांना ट्‍वीट करून मदत मागितली होती. संबंधित महिलेची प्रवासादरम्यान छेड काढण्यात आली होती. महिलेला भुसावळ स्टेशनवर मदत देण्यात आली होती.

मदत मिळाल्यानंतर विद्यार्थी म्हणाले, थॅक्स रेल्वेमंत्री..
भुकेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांना वेळेत जेवण मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डि‍जिटल इंडि‍याचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थी रोहितने सांगितले की, रेल्वेमंत्री प्रभु ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह राहातात. त्यामुळे त्यांना ‍ट्‍वीट केले व अपेक्षेप्रमाणे त्यांनी आमची मदत केली.

देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून देशातील चित्र पालटले आहे. अधिकारीच नव्हे तर मंत्री देखील जनतेला मदत करत असल्याचे एसीएनचा विद्यार्थी अमित कुमारने सां‍गितले.

दरम्यान, लोकल चीफ एरिया मॅनेजर रवी प्रकाश चतुर्वेदी यांनी सांगितले की, हरिद्वार-हावडा कुंभ एक्स्प्रेसमध्ये पेंट्रीकार नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. एक्स्प्रेस भदोहीजवळ असताना रात्री 10 वाजता रेल्वे बोर्डाकडून सूचना मिळाली. सुचनेनुसार प्रवाशी विद्यार्थ्यांची वाराणसी स्टेशनवर अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली.