आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात स्मशानात राहावे लागत आहे तरुणांना, रोज करतात हनुमान चालीसाचे पठन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच कुलवंतसिंह यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर युवक स्मशानात करतात अभ्यास. - Divya Marathi
कोच कुलवंतसिंह यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर युवक स्मशानात करतात अभ्यास.
जैतसर (राजस्थान) - श्रीगंगानगर जिल्ह्यातील जैतसर हे एक छोटे गाव. जवळपास 2 हजार लोकसंख्या. बाहेरुन येऊन गावात राहाणारे बोटावर मोजण्याएवढे लोक. मात्र अचानक येथे युवक-युवतींची वर्दळ वाढली आणि त्यांच्या राहाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही युवकांनी स्मशानालाच आपले घर बनवले आणि ते तिथे राहू लागले.

का आली स्मशानात राहाण्याची वेळ
> राजस्थानमधील विविध ठिकाणांहून जवळपास 200 युवक-युवती लष्कर आणि पोलिस भरती तयारीसाठी येथे आले आहेत. येथील कोच कुलवंत सिंह हे निशुल्क प्रशिक्षण देत असल्यामुळे जैतसरकडे युवकांचा ओढा वाढला. मात्र गावात घर किरायाने देण्याची प्रथा नसल्यामुळे गावात आलेल्या युवकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला.
> येथे आलेल्या 25 युवतीची कशीतरी राहाण्याची सोय झाली मात्र तरुणांना घरात ठेवून घेण्यास कोणीही तयार नव्हते.
> अशा परिस्थितीत बिश्नोई धर्मशाळा ही या युवकांसाठी आसरा झाली. मात्र येथेही जाग अपुरी पडू लागले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने आलेले युवक धर्मशाळेत मावेनासे झाले.
> ज्यांना धर्मशाळेत जागा मिळाली नाही त्यांची पुन्हा घरासाठी पायपीट सुरु झाली. कोणीतरी त्यांना थट्टेत स्मशानात जाऊन राहा, असे सांगितले. तिथे काही खोल्याही होत्या आणि पाण्याचीही व्यवस्था होती.
> तरुणांना हा पर्याय योग्य वाटला. स्मशानातील स्वर्ग आश्रमाला लागून असलेल्या बलदेव किशन यांच्याकडे ते गेले आणि स्मशानात राहाण्याची परवानगी मागितली.
> स्मशानात राहाण्याची परवानगी मागितल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी गावातील लोकांशी चर्चा केली आणि 20 युवकांना तिथे राहाण्याची परवानगी दिली.
रोज रात्री करतात हनुमान चालीसापाठ
> स्मशानात राहाणाऱ्या या युवकांचे वय 18-20 दरम्यान आहे. येथे राहाण्यासोबतच ते येथे जेवण तयारही करता आणि भोजनही करतात.
> स्मशानात काही रोज मृतदेह येत नाहीत. ज्या दिवशी चिता जळते त्या रात्री मात्र झोप लागत नसल्याची कबुली तरुणांनी दिली आहे.
> येथे आल्यापासून सर्वजण रोज रात्री सामुहिक हनुमान चालिसापाठ करतात.
> युवकांनी सांगितले की ज्या दिवशी जारदार पाऊस आणि वीजांचा कडकडाट होतो त्या रात्री भीती वाटते. मात्र आता आम्ही येथे राहायला शिकलो आहोत.
> येथे राहाणारा सुखजीत सांगतो की एक महिना आम्ही रुम शोधत होतो. घरी परत जायचे नाही हे तर नक्की होते. त्यामुळे स्मशानात तर स्मशानात, फक्त राहाण्याची सोय हवी होती.
> आता येथे राहून अनेक दिवस झाले आहेत त्यामुळे येथील दिनक्रमाची सवय झाली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्मशानात कसे राहातात तरुण
बातम्या आणखी आहेत...